पोलीस भरती

#CoronaVirus बीड: आणखी ८ जण कोविड-१९ पॉझिटीव्ह

बीड दि.१९:आठवडा विशेष टीम― आज मंगळवारी बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या ६७ नमुन्यातील ८ व्यक्तीचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तसेच अन्य ३ व्यक्तींबाबत निष्कर्ष निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे.आज पाठवलेल्या स्वॅब मध्ये केळगाव, चंदन सावरगाव ता. केज, इटकुर ता. गेवराई आणि बीड शहरातील स्वॅब नमुन्यांचा समावेश आहे.

एकूणच पाहता बीड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.मास्क घालूनच खूपच अत्यावश्यक असल्यास बाहेर पडावे.बाहेरजिल्ह्यातून तसेच कंटेन्मेंट झोन मधून आलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी.

कंटेन्मेंट झोन मधील कुठे व किती घरांचा सर्व्हे करण्यात आला ?

  • इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील 4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • पाटण सांगवी ता. आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
  • कवडगावथडी ता. माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *