अंबाजोगाई (प्रतिनिधी): जेतवन प्रतिष्ठाण, पोखरी यांच्या वतीने आयोजित दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद रविवार, दि.31 मार्च रोजी संपन्न झाली.या बौद्ध धम्म परिषदेत मार्गदर्शक म्हणुन भिक्खु पय्यानंद (लातूर) यांचे मार्गदर्शन तर भिक्खु यशकाश्यप महाथेरो (जयसिंगपुर), यांनी धम्मदेसना दिली या प्रसंगी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी विचार घेवून धम्म चळवळीत योगदान देणारे प्रा.डी.जी.धाकडे व प्रा. सौ.शकुंतला धाकडे (अंबाजोगाई), लक्ष्मणराव रोडे (बीड), सौ.सुधाताई श्रीपती जोगदंड,आर.एम. कांबळे (माजलगाव), खंडेराव जाधव या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांचा धम्म रक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी धम्मपिठावर अध्यक्ष म्हणुन प्रा.आर.के.काळे हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, स्वागताध्यक्ष जितेंद्र पोटभरे,उद्घाटक डॉ.राहुल धाकडे तसेच यावेळी विशेष उपस्थिती म्हणून डॉ.संजय बनसोडे तर प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रा.प्रदिप रोडे,श्रीहरी बप्पा होळकर,राजेंद्र घोडके,अॅड.माणिक आदमाने,अॅड.बाळासाहेब जाधव,भारत सालपे,बी.आर. सोनवणे,अमरसिंह ढाका,भारत सातपुते, प्रा.श्रीपती वाघमारे, प्रा.डॉ.किरण चक्रे, प्रा.प्रकाश कांबळे, सुनिल साळवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी प्रा.डि.जी. धाकडे व प्रा.सौ.धाकडे या मान्यवरांचा सपत्निक “धम्म रक्षक पुरस्कार” देवून सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ असे आहे. धम्म रक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डी.जी.धाकडे (अंबाजोगाई) , लक्ष्मणराव रोडे (बीड), सौ.सुधाताई श्रीपती जोगदंड (अंबाजोगाई),आर.एम.कांबळे (माजलगाव),खंडेराव जाधव (अंबाजोगाई)या मान्यवरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी सुमित वाघमारे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार बप्पा कदम यांनी मानले.तर
जेतवन प्रतिष्ठाण, पोखरी यांच्या वतीने आयोजित दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्येने बौध्द उपासक व बौध्द उपासिका यांची उपस्थिती होती.धम्म परीषदेच्या यशस्वितेसाठी कैलास वाघमारे,प्रकाश मस्के,शैलेश साळवे, रामलिंग वाघमारे यांचेसह अनेकांनी परिश्रम घेतले.