अंबाजोगाई तालुकाआर्थिकबीड जिल्हा

अंबाजोगाई पिपल्स बँकेकडे मार्च 2019 अखेर 345 कोटींच्या ठेवी आणि 2 कोटींचा नफा―चेअरमन राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.०७: मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे झेपावणा-या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे 31 मार्च 2019 अखेर सुमारे 345 कोटी 92 लाख रूपयांच्या ठेवी आणि बँकेस 2 कोटी 5 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयासह 16 शाखा व व दोन विस्तारीत कक्ष असा विस्तार झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि तरूण उद्योजकांना अर्थपुरवठा करण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 1996 साली स्थापना करण्यात आली.पिपल्स बँकेने लघुउद्योगांसाठी कर्जपुरवठा करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सहकार्य केले.ही बँक आज खर्‍या अर्थाने आधारवड ठरली आहे. बँकेचे मुख्य कार्यालयासह 16 शाखा व दोन विस्तारीत कक्ष आहेत.बँकेच्या अंबाजोगाई,विस्तारित कक्ष (अंबाजोगाई), सिरसाळा,बीड,सिडको (औरंगाबाद),जालना,उस्मानपुरा (औरंगाबाद), अहमदनगर,औसा,कळंब,उदगीर, जामखेड,गेवराई, माजलगाव, जोगाईवाडी (अंबाजोगाई),लातूर, वाघोली (पुणे) आणि विस्तारीत कक्ष (जोगाईवाडी) या सर्व सोळा शाखा व दोन विस्तारीत कक्ष कार्यरत आहेत.बँकेच्या वतीनेे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे की, सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावता येते.सामाजिक बांधिलकी मानुन ही बँक काम करीत आहे. याच उद्देशाने आमचे श्रद्धास्थान असणारे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी व दिवंगत लोकनेेते माजी आ.बाबुरावजी आडसकर साहेबांनी त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच आज अंबाजोगाई पिपल्स बँक आज खर्‍या अर्थाने प्रगतीकडे झेपावते आहे.1996 साली लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे.या बँकेच्या सर्व शाखा व मुख्य कार्यालय संपुर्णपणे कोअर बँकींग व संगणकीकृत आहे. भारताच्या प्रमुख शहरामध्ये देय असलेल्या डिडीची सुविधा उपलब्ध आहे. सध्या बँकेच्या अंबाजोगाई,लातूर, जोगाईवाडी,सिडको(औरंगाबाद),कळंब,वाघोली(पुणे)या शाखेत रूपे एटीएम व इन्स्टा कार्ड सुविधा सुरू आहे.लवकरच बँकेच्या सर्वच शाखेत रूपे एटीएम व इन्स्टा कार्ड सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तात्काळ सोने तारण कर्ज,ठेवीवर ठेव वीमा योजने अंतर्गत विमा संरक्षण,जेष्ठ नागरिकांना ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याज दिले जाते.वाहन कर्ज, गृह,वैयक्तिक, लघुउद्योग व औद्योगिक कर्ज देण्यात येते.सेफ डिपॉझिट लॉकर्स, आरटीजीएस/एनईएफटी सुविधा, बँकेचा बॅलन्स इन्क्वायरी क्रमांक (8306101111) असा आहे.नॅशनल अ‍ॅटोमेटड क्लिअरींग (एन.ए.सी.एच.) सुविधा दिली जाते. बँकेच्या सर्व शाखेतील ग्राहकांना एसएमएस बँकिंग सुविधा यासहित विविध ठेव योजना बँकेच्या वतीनेे राबविल्या जातात.“ग्राहक हेच आपले दैवत” मानुन तत्पर व विनम्र सेवा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीने केला जात आहे. बँकेकडुन सायंकालीन सेवा पुरविण्यात येते. 31 मार्च 2019 अखेर बँकेची सभासद संख्या 10,629 एवढी असून बँकेकडे 345 कोटी 92 लाख रूपयांच्या ठेवी आहेत.बँकेने 185 कोटी 34 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.बँकेकडे 10 कोटी 10 लाख वसुल भागभांडवल असून 25 कोटी 53 लाख रूपयांचा स्वनिधी आहे. बँकेने 169 कोटी 90 लाख रूपयांची गुंतवणूकही केली आहे. बँकेस 31 मार्च 2019 अखेर 2 कोटी 5 लाख रूपयांचा नफा झाला आहे.बँकेस सातत्याने लेखा परिक्षणाचा ऑडीट “अ” वर्ग मिळालेला आहे.अशी माहिती चेअरमन राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.सध्या अंबाजोगाई शाखेत एटीएमची सुविधा उपलब्ध आहे.बँकेच्या इतर शाखांमध्येही लवकरच एटीएम सेवा सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे.पाच वर्षापुर्वी डाटा सेंटरचे काम पुर्ण करून ग्राहकांसाठी कोअर बँकिंगव्दारे समाधानकारक सेवा देणे सुरु आहे. अंबाजोगाई शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँक आपले योगदान देत आहे.बँकेचे सर्व सभासद,हितचिंतक, ग्राहक,ठेवीदार,कर्जदार आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. बँकेच्या सर्वांगीण वाटचालीत व विकासात व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,संचालक सर्वश्री प्रा.वसंतराव चव्हाण,अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,दत्तात्रय दमकोंडवार, अरुण काळे,पुरुषोत्तम चोकडा,शेख मेहमुद शेख दादामियाँ,मोहन कुलकर्णी,लक्ष्मण दासुद,सुरेश मोदी, श्रीमती सिमिंतीनी देशमुख,प्रा.सौ.रुक्मीणी पवार,सौ.रोहिणी पाठक,सुरेशराव देशपांडे,सचिन बेंबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड, सर्व अधिकारी,सर्व शाखाधिकारी,कर्मचारी, पिग्मी एजंट यांचाही महत्वपूर्ण वाटा असल्याचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button