परळी-वैजनाथ:येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून परळी शहरातील आनंदधाम येथील जागेत माजी उपराष्ट्रपती तथा अखिल भारतीय बसव समितीचे अध्यक्ष बी.डी.जत्ती यांचे सुपुत्र अरविंद जत्ती यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पुणे येथून 26 मे रोजी सामाजीक समतेचा उद्देश घेवून निघालेल्या समता नायक जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर संदेश यात्रेनिमित्त जत्ती, सौ.शारदाताई जत्ती यांच्यासोबत संदेश यात्रेचे आयोजक ऍड.अविनाश भोसीकर,चंद्रशेखर होनशाळ, एस.व्ही.शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पोलीस स्टेशन लगतच्या आनंदधाम जागेत अरविंद जत्ती यांच्या हस्ते बेल, पिंपळ, वड या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री श्री श्री 108 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, ऍड.रमेश साखरे, न.प.माजी सभापती वैजनाथ बागवाले, सोमनाथ निलंगे, आत्मलिंग शेटे, गंगाखेड येथील नगरसेवक राजेश दामा, दयानंद चौधरी, अमोल घेवारे, संतोष पंचाक्षरी, सोमनाथ गोपनपाळे, राजेश साखरे, शिरीष सलगरे, महालिंग स्वामी, शिवराजअप्पा बोटुळे, गुरूलिंग स्वामी, संदीप चौधरी, सोमनाथ स्वामी, कैलास रिकीबे, वैजनाथ शेटे, रवी मिसाळ यांनी वृक्षारोपणासाठी परीश्रम घेवून सहभाग घेतला.
समता संदेश यात्रेत महात्मा बसवेश्वरांची 14 फुट उंचीची भव्य मुर्ती असून यात्रेचा समारोप 16 जुन रोजी कोल्हापुर येथे होणार असल्याची माहिती श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी दिली आहे.
0