Offer

लिंबागणेश पोलिस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस मित्र ग्रुपच्यावतीने निरोप समारंभ ; नविन कर्मचाऱ्यांचे स्वागत

लिंबागणेश, बीड: (दि. ०६ जून) बीड जिल्ह्यातील नेमकुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लिंबागणेश पोलिस चौकीतील बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा, पोलिस मित्र ग्रुप लिंबागणेश यांच्या वतीने आज, शुक्रवार, दि. ०६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागतही करण्यात आले.

या समारंभात पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंढे आणि एम. तांदळे यांचा सत्कार करण्यात आला. पोखरी (घाट) चे सरपंच बिभीषण मुळीक आणि महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.

यावेळी उपस्थित विश्वंभर गिरी आणि ग्रामपंचायत सदस्य समीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रशंसनीय कामाचा आढावा घेत ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन करत ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि निरोप समारंभाबद्दल आभार मानले.

बीड पोलिस दलात मोठे फेरबदल: पोलिस अधीक्षक बीड, नवनीत कांवत यांनी बीडमधील पोलिस दलात मोठे फेरबदल करत दि. २१ मे रोजी ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल ते उपनिरीक्षक स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नेकनुर पोलिस ठाणे अंतर्गत लिंबागणेश पोलिस चौकीतील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष राऊत यांची शिवाजीनगर पोलिस स्टेशन बीड येथे, बाबासाहेब डोंगरे आणि नवनाथ मुंढे यांची अंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन येथे, तर मधुकर तांदळे यांची पाटोदा पोलिस स्टेशन येथे बदली झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिस मित्र ग्रुप लिंबागणेश यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमास माजी सैनिक मारोती रणखांब, सय्यद बशीर, विक्रांत वाणी, अँड. गणेश वाणी, औदुंबर नाईकवाडे, सय्यद अख्तर, बाळू कदम, तुकाराम गायकवाड, तुळशीराम पवार, बालाजी निर्मळ, जितेंद्र निर्मळ, कृष्णा वायभट, योगेश शिंदे, केशव गिरे आदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नवनियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वागत: लिंबागणेश पोलिस चौकीतील सर्व जुन्या कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे, नव्याने रुजू झालेले सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख (लिंबागणेश बीट), सहाय्यक फौजदार गोविंद बडे (पिंपळवाडी बीट), पो. हवालदार सतीश राऊत (मदतनीस लिंबागणेश), आणि पो. हवालदार सुदाम शेलार (मदतनीस पिंपळवाडी) यांचेही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button