Offer

आज सोन्याचे दर धडकन कोसळले, जाणून घ्या २२ व २४ कॅरेट सोन्याचा दर

आठवडा विशेष —

मुंबई – Gold Rate Today : आज सोन्याचे दर धडकन कोसळले आहे. सोमवार 9 जून रोजी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली, तब्बल 1600 रुपायांनी सोनं स्वस्त झाल्यांने ग्राहकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. देशातील दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सरासरी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 97,900 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,700 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे.

आज सकाळी दिल्लीत 24 कॅरेट सोने 98,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोने 89,940 रुपये गेले आहे. गेल्या आठवड्याच्या विचार करता आज सोने 1630 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत 22 कॅरेट सोने 89,790 रुपये आणि 24 कॅरेट सोने 97,960 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. चांदीचा भाव 1,06,900 रुपये प्रति किलो आहे. आज चांदीचा भाव 200 रुपयांपर्यंत घसरला आहे.

लग्नसराई आली, सोनं घेताय? मग हे जाणून घ्या!

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि अशा वेळी नेहमीप्रमाणे सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू आहेत. तज्ज्ञ सांगतात की यामागे आंतरराष्ट्रीय व्यापारातील तणाव, म्हणजेच व्यापार युद्धाचा प्रभाव आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कधी भाव वाढतोय, तर कधी घसरतोय.

पण आपल्या देशांतर्गत सराफा बाजारात मात्र सध्या सोन्याच्या किमती घसरत आहेत – आणि ही गोष्ट खरेदीदारांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. याचवेळी फ्युचर्स मार्केटमध्ये किंमती थोड्याफार प्रमाणात वाढताना दिसत आहेत, आणि परदेशी बाजारपेठेतही काही प्रमाणात तेजी आहे.

तज्ज्ञांचं मत असं आहे की, पुढच्याही काळात सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये अशाच प्रकारचे चढ-उतार पाहायला मिळतील.

पण सोन्याचा दर ठरतो तरी कसा?

भारतात सोन्याचे दर काही ठराविक घटकांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, रुपयाचा डॉलरशी विनिमय दर आणि सरकारने लावलेले कर – हे सगळेच त्यावर परिणाम करतात.

आपल्यासाठी सोनं म्हणजे फक्त गुंतवणूक नव्हे, तर एक परंपरा आहे. सण-उत्सव, लग्नकार्य अशा वेळी सोन्याची मागणी अचानक वाढते – आणि त्याचं सरळसरळ परिणाम किमतींवर होतो. त्यामुळे असे काळ हे खरेदीसाठी योग्य असतात की थांबावे – याचा विचार जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button