Offer

अहमदपूर -चाकूर मधून मागितले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेचे तिकीट ; धनराज गुट्टे लढवणार विधानसभा

लातूर:आठवडा विशेष टीम―आज लातूर येथे अहमदपूर – चाकूर विधानसभा मतदारसंघा साठी पक्ष निरीक्षक व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.तर अहमदपूर-चाकुर विधानसभा मतदारसंघातुन भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक असलेले धनराज गुट्टे यांनी देखील मुलाखत दिली आहे. आज जीवनात पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच तिकीट मिळण्यासाठी मुलाखत दिली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच शेवटी पक्ष घेईल तो निर्णय मान्यच असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विशेष म्हणजे,माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फक्त भाजप मध्येच विधानसभा तिकीट मागण्याची संधी भेटू शकते.आता निर्णय पालकमंत्री,ग्रामविकास मंत्री,पाणीपुरवठा मंत्री,प्रदेश अध्यक्ष,मुख्यमंत्री यांच्याकडे गेला असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोण आहेत धनराज विक्रम गुट्टे?

रेल्वे बोर्ड सदस्य भारत सरकार,अध्यक्ष-प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना,अध्यक्ष-अखिल भारतीय वंजारी युवा संघटन,प्रदेश उपाध्यक्ष-भाजप,भाजपा पक्ष प्रभारी-गडचिरोली चंद्रपूर जिल्हा अशा अनेक पदांवर कार्यरत असलेले गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सहवासात घडलेले कार्यकर्ते म्हणून धनराज(भाऊ)गुट्टे यांची ओळख आहे.
येलदरी,ता.अहमदपूर जिल्हा लातूर या गावचे रहिवाशी असलेले धनराज गुट्टे आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक भाजपा च्या तिकिटावर लढवणार आहेत.

2 Comments

  1. तरुण , उमदा बीजेपी कार्यकर्ता , संधी मिळाल्यावर नक्की निवडून येणार कारण त्यांच्यामागे तरुणाई आहे
    सर्वाना मदत करणारा तरुण कार्यकर्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button