Offer

भाजपाच्या इनकमींगचा अखंड झरा सुरुच; राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल ,पंकजाताई मुंडेंना विजयी करण्याचा केला निर्धार

परळी:आठवडा विशेष टीम―
परळी शहरातील जुना रेल्वे स्टेशन, हबीबपुरा, भागातील शेकडो राष्ट्रवादीच्या पदाधिका·यांनी ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व भाजपा नेते प्रा.टी. पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्या इन्कमींगचा अखंड झरा सुरुच आहे. परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचशे प्रमुख पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला शहरात मोठे खिंडार पडले आहे. भापपा-शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांना विजय करण्याचा व मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार येथील पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

प्रा. टी. पी. मुंडे सर व स्व. गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार केशवराव दादा आंधळे, धारुरचे नगरसेवक गफफार भाई, रामकृष्ण काका घुले, भाजपचे ज्येष्ठ नेते सलाउद्दीन मामू, मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे,बबलू सय्यद साजेद इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामध्ये फिरोज नुर मोहम्मद शेख, खालेद वाहेद शेख, याकुर रईस शेख, अतिक युनुस पठाण, खलील एजाज शेख, मोईज इमाम शेख, तौफीक शेख, शकील हबीब शेख, सरफराज इसाक शेख, मुनवर अनवर सय्यद, सोहेल माजीद शेख, अजहर नासर शेख, जब्बार सत्तार शेख, मुनतु बशीर शेख, सिद्दीकी मुस्तफा शेख, कलीम शरीफ शेख, वहीद मुनीर शेख, कादर शेख, असद खान, आसीफ खान, जुबेर इब्राहिम शेख, शेख समंदर, शेख खदीर, शेख सिकंदर नजीर शेख, इम्रान जलील खान, असलम जाफर, शेख नवीद, शेख मुदस्सर, खदीर शेख, रशीद पठाण, मेहराज शेख अख्तर, शेख मुस्तफा नबी, शेख शाहदाब खदीर, शेख इम्रान राजा, शेख इत्फेखार, शेख जुबेर, शेख रिजवान, खान इम्रान मौला, शेख आसीफ, शेख मुखीद, शेख सरफराज, शेख सद्दाम इत्यादीसह शेकडो कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत प्रा. टी. पी. मुंडे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button