परळी:आठवडा विशेष टीम― परळी तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळामुळे पाणीसाठा शून्यावर येऊन पोहोचला होता नागापूर वाण धरणात पाणी संपलेले होते त्यामुळे वीज केंद्रासाठी लागणाऱ्या पाणी गोदावरी नदीवर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाऱ्याचे पाणी मिळण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी शासनाकडे दिनांक 2 मे 2019 ला अर्जाद्वारे विनंती करून शासनाकडून दिनांक 24 मे 2019 ला मुख्य सचिवांकडून आदेश नगरविकास विभागा कडून माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले त्यावर शासनाकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2019ला कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना उचित कारवाई करून शासन स्तरावर हा प्रश्न खडका बंधाऱ्याच्या पाण्यासंदर्भात सोडवावा असे आदेशप्राप्त झालेले आहेत अशी माहिती वसंतराव मुंडे यांनी दिली परळी शहराला पाणी तात्काळ खडका बंधाऱ्याचे सोडण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून प्रशासनाला आदेश आणून दिलेले आहेत.
परंतु पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे परळी वासियांना पाणीप्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला परळी चे थर्मल पावर स्टेशनचे सर्व संच बंद असल्यामुळे पाणीसाठा शिल्लक होता तरीही श्रेय वादामुळे पाणीप्रश्न गंभीर सत्ताधाऱ्यांनी बनवला असावा काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे आरोप यांनी केला आहे दुष्काळामुळे परळीत तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर बोर विहिरी नद्या ओढे छोटे-मोठे धरणे आटल्यामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला गावागावात वार्डात शहरात पाण्यासाठी महिला-पुरुष लहान मुलं जनावरे वन वन भटकत होती करिता उपायोजना करण्यात दखल प्रशासनात घेतली नाही तरी वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार नाशिक विभाग भारत सरकार यांच्या पाठपुराव्यामुळे खडका बंधाऱ्याचे पाणी परळी शहराला मिळण्यासाठी सर्व मार्ग आदेशामुळे खुले झाले आहेत तरी तात्काळ प्रशासनाकडून उपायोजना करण्याची मागणी वसंतराव मुंडे यांनी केली आहे केली आहे.