पाटोदा:आठवडा विशेष टीम―
ढाळेवाडी येथील शेतकरी श्री,नाना हुले हे शेतकरी आपली शेती करत शेतीला जोडधंदा म्हणून गाई व माशीचे पालन करू दुधाच्या पैशातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम करत होते,सोमवार दि.१७ रोजी वालवड येथील गुरांच्या बाजारातून ५१००० हजार रुपये देऊन पाहिल्या वेताची जर्सी(संकरित) गाय विकत आणली होती,ती शुक्रवारी सकाळी वेली व वेल्यानंतर ती दोन दिवस दूध देत होती, व्यवस्थित चारा खात होती,आज सकाळी ८ वाजता नाना हुले यांनी आपल्या शेतामध्ये चारा खाण्यासाठी स्वतःच्या शेतात बांधली होती, १०:३० वाजता गाईला पाणी पाजण्यासाठी गेले असता ती गाय जमिनीवर फुगून मारून पडलेल्या अवस्थेत दिसली, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,त्यामुळे प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने या एकत्रित प्रकारची माहिती व दखल घेऊन नाना हुले ऊसतोडणी थांबवून अल्प प्रमाणात दुधाचा जोडधंदा करत होते,या अचानक आलेल्या संकटामुळे नाना हुले हतबल झाले आहेत.
या संबंधित शेतकऱ्यांला शासनाच्या वतीने अथवा लोकप्रतिनिधीच्या वतीने आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0
