बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्याच्या विविध भागातून पाठविण्यात आलेल्या ७७ नमुन्यांपैकी ७३ नमुने निगेटिव्ह असून दोन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याने बीड जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आता ११ झाला आहे. दरम्यान आज पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या दोन नमुन्यांचा समावेश आहे तर आणखी दोन नुमन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. जिल्हयात ११ रुग्णांची नोंद असली तरी यातील एकाचा मृत्यु झाला असून सहा रुग्ण पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे ४ रुग्ण आहेत.
गेवराई आणि माजलगाव तालुक्यात दोन दिवसापूर्वी प्रत्येकी १ कोरोना रुग्ण आढळला होता, तर आष्टी तालुक्यात रविवारी ७ कोरोना रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब सोमवारी घेण्यात आले होते. माजलगाव तालुक्यातून सर्वाधिक ४२ स्वाब घेण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या नमुन्यापैकी दोन नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. लातूरच्या विषाणू संशोधन निदान प्रयोग शाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.विजय चिंचोलकर यांनी हि माहिती दिली.
दरम्यान ज्या ठिकाणी कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तेथील ३ किमी परिसरातील गावे कंटेनमेंट झोन तर त्या पुढील ४ किलोमीटरवरील गावे बफर झोन घोषित करण्याची प्रक्रिया सुरु असून त्या ठिकाणी आरोग्य विभाग सर्व्हेक्षण करणार आहे.
