सोयगाव,ता.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयगाव तालुक्यात पूरग्रस्त झालेल्या गावांना मृत जनावरे व व्यक्तींच्या नुकसान भरपाईची चार लाख ८९ हजार इतकी रक्कम मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.या रक्कमेची नुकसान झालेल्या वारसांच्या खात्यावर थेट अनुदान पद्धतीत वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
अतिवृष्टीच्या तडाख्यात सोयगाव तालुक्यात काही भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती यामध्ये बनोटी मंडळात हिवरा नदीला आलेल्या पुरात देवसिंग दगडू शिंदे या गुराख्याचा पुरात वाहून मृत्यू झाला होता.या मृत वारसांच्या नावे चार लाख आणि काही भागात मृत जनावरांच्या नुकसानीपोटी ८९ हजार इतक रक्कम सोयगाव तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे.सोयगाव तालुक्यात बनोटी मंडळात झालेल्या अतिवृष्टीत लेनापूर शिवारात तीन शेळ्या,उपल्खेडा गावात एक म्हैस,निंबायती येथे एक म्हैस,आणि किन्ही ता.सोयगाव येथे १० मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.
0