सोयगाव:आठवडा विशेष टीम―
बोंडअळींनी प्रादुर्भाव झालेल्या कपाशीची पाने खाण्यात आल्याने सोयगाव तालुक्यात तब्बल २५० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.मेंढ्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याने यंदाच्या हंगामात मेंढपाळांवर संकट कोसळले आहे.सोयगाव परिसरात या प्रकारामुळे २५० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यावर उपाय योजनांसाठी मात्र प्रशासन पुढे आलेले नसल्याने मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत आहे.
खरीपाचा हंगाम संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ उदरनिर्वाह भागविण्यासाठी आले आहे.तालुक्याच्या विविध भागात शेती शिवारात या मेंढपाळांनी शेतात मेंढ्या सोडल्या असून मात्र कपाशी वरील बोंड अळींच्या बाधित पाने खाल्ल्याने विषबाधा होवून मेंढ्या मृत होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकारामुळे मेंढपाळ त्रस्त झाले असून त्यांचे नुकसान होत असल्याने मेंढपाळांनी कपाशीवरील बोंड अळींच्या धास्तीने परतीचा प्रवास सुरु केला आहे.
सोयगाव तालुक्यात खरीपात कपाशी लागवडीचे वाढीव क्षेत्र आहे.या कपाशीमध्ये शेतकऱ्यांनी शेत स्वच्छ करण्यासाठी मेंढ्या बसविल्या आहे.परंतु कपाशी पिकांवर झालेल्या बोंडअळींच्या प्रादुर्भावाने विषबाधा होवून खाल्लेल्या पानांच्या विषाने मेंढ्यांना गुंगी येवून त्या मृत पावत आहे.