विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी बालझुंबड उपयुक्त -साहित्यीक दिनकर जोशी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― प्रियदर्शनी क्रिडा सांस्कृतिक व व्यायाम मंंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय बालझुंबड- 2020 उपक्रमा अंतर्गत असणार्या विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ नुकताच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना साहित्यीक दिनकर जोशी यांनी सांगितले की,19 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमातून सांस्कृतीक क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करण्याचे काम करण्यात आले.विविध प्रतिभांना प्रोत्साहन मिळाले.साने गुरूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाने सानेगुरूजी यांच्या मातोश्री यशोदामाता यांचा स्मृती शताब्दी सोहळा गत 2 वर्षापुर्वी साजरा केला.राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दोन पिढ्या घडल्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना बालझुंबड उपयुक्त असल्याचे प्रतिपादन साहित्यीक दिनकर जोशी यांनी केले.
येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात नुकताच बालझुंबड-2020 चा बक्षीस वितरण सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या प्रसंगी विविध क्षेत्रातील कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत संयोजक राजकिशोर मोदी व सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व संयोजक राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्षा सौ.सविताताई लोमटे,सभापती ज्योतीताई सरवदे,उपसभापती सौ.संगीता सुनिल व्यवहारे,डॉ.प्रदिप शेंडगे,डॉ.गणेश तोंडगे,डॉ. विश्वजीत पवार,डॉ.वर्षा नागरगोजे,डॉ.प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.माधव मेश्राम,प्रा.गणेश पिंगळे,अॅड.अजय बुरांडे, अॅड.बालासाहेब चौधरी,अॅड. राजेंद्र धायगुडे,अॅड.रागीणी कदम,इनरव्हील अध्यक्षा सुहासिनी मोदी,योगेश्वरी रोटरीचे अध्यक्ष सदाशिव सोनवणे,ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबुराव बाभुळगावकर, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक धम्मपाल सरवदे,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर, प्रा.एस.ए.बिराजदार,राणा चव्हाण,विजय रापतवार,सुनिल व्यवहारे,सचिन जाधव, विशाल जगताप,प्रा.अनंत कांबळे, समन्वयक राजेश कांबळे, चंद्रकांत गायकवाड,आनंद टाकळकर,विनायक मुंजे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.तर कार्यक्रमास पत्रकारिता, वैद्यकीय,विधी,व्यापार,शिक्षण,सहकार,सांस्कृतिक,नाट्य,संगीत,सामाजिक,राजकिय आदी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे हस्ते बालझुंबड मधील क्विझ कॉम्पीटीशन,पी.पी.टी. कॉम्पीटीशन,चित्रकला, रंगभरण,वैयक्तीक नृत्य, सामुहिक नृत्य,कथाकथन, सायन्स सर्च या स्पर्धेतील सर्व गटातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून गुणगौरव करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते योगेश्वरी देवी,राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद, नटराज व सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली.विजेत्यांनी नृत्य कलाप्रकार सादर केले.
यावेळी बालझुंबड-2020 मधील पुढील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. रंगभरण स्पर्धा गट 1 ली ते 2 री मानसी महेश अकोलकर (प्रथम),आरूष वामनराव गित्ते (द्वितीय),शौर्य कुलकर्णी (तृतीय),राजवीर रविंद्र देशमुख (उत्तेजनार्थ),रंगभरण स्पर्धा गट 3 री ते 4 थी श्रावणी अजय वाघाळकर (प्रथम),आर्यन दत्ता कांबळे (द्वितीय), हर्षा प्रदिप चव्हाण (तृतीय), प्रथमेश धनंजय जाधव (उत्तेजनार्थ), चित्रकला स्पर्धा पाचवी ते सातवी गट अंकिता किरण फुटाणे (प्रथम), तनुजा अरूण आदमाने (द्वितीय), शिवाणी अनिल मुरकुटे (तृतीय), प्राची साहेबराव जाधव (उत्तेजनार्थ), चित्रकला स्पर्धा 8 वी ते 10 वी गट रविराज दयानंद वाघचौरे (प्रथम),प्रेरणा भगवान आचार्य (द्वितीय),सानिया समिर मनियार (तृतीय),साधना अप्पासाहेब ठोंबरे (उत्तेजनार्थ),कथाकथन स्पर्धा गट 3 री ते 4 थी आर्द्रा राहुल शिंदे (प्रथम),श्लोक संदीपान फड (द्वितीय),अवंती महेंद्र लोमटे (तृतीय),स्वरा राजेंद्र धायगुडे (उत्तेजनार्थ), सायन्स सर्च स्पर्धा गट 5 वी ते 7 वी प्रथमेश श्रीकृष्ण टोंगे (प्रथम), विराज राहुल घोडके (द्वितीय), प्रिती प्रविण आढाव (तृतीय), साहील संदीप क्षीरसागर (उत्तेजनार्थ), सायन्स सर्च स्पर्धा गट 8 वी ते 10 वी कुंज विक्रम सुतार (प्रथम), वरद विनायक मुंजे (द्वितीय),अभिषेक धर्मेंद्र कुशवाह (तृतीय),सर्वेश आशिष परदेशी (उत्तेजनार्थ), क्विझ काँम्पीटीशन गट 5 वी ते 7 वी अर्थव नवनाथ घुगे, वैभवी जोगदंड (प्रथम),श्रावणी बोडके, प्रभु शेटे (द्वितीय), अर्जुन पाचेगावकर,पार्थ जायभाय (तृतीय),उमंग बुरांडे, भगवंत गोचडे (उत्तेजनार्थ), क्विझ काँम्पीटीशन गट 8 वी ते 10 वी पंकजा केंद्रे,एकता बनसोडे (प्रथम),अनिषा हंडवे, सिद्धी सुर्यवंशी (द्वितीय),सौमित्र कुलकर्णी,सोहम गायकवाड (तृतीय),केदार भस्मे,सुमित केंद्रे (उत्तेजनार्थ),पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (पीपीटी) स्पर्धा गट 5 वी ते 7 अभिषेक मुंडे,मंदार कदम (प्रथम),अभिज्ञ कुलकर्णी,अभिजीत गिरी (द्वितीय),सई झिरमिरे, वैभवी इंगळे (तृतीय),चैतन्य मिसाळ, विश्वजीत शेप (उत्तेजनार्थ), पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (पीपीटी) स्पर्धा गट 8 वी ते 10 वी सिद्धांत कदम, सुदेशना चक्रवती (प्रथम), रणवीर कांबळे, शिवम एरंडे (द्वितीय),शयनाझ सय्यद सादेक,सुमेक्ष कांबळे (तृतीय), दिया तोष्णीवाल, इशा तापडीया (उत्तेजनार्थ),वैयक्तीक नृत्य गट 1 ली ते 4 थी आर्पिता राठोड (प्रथम), गिता उकरे (द्वितीय), ऋषीकेश सानप (तृतीय), ईलॅक्सी जाधव (उत्तेजनार्थ), वैयक्तीक नृत्य गट 5 वी ते 7 वी ऋषीकेश मुंदडा (प्रथम), आकाश गायकवाड (द्वितीय), झुबेन सय्यद (तृतीय), देवयाणी देशमुख (उत्तेजनार्थ) वैयक्तीक नृत्य गट 8 वी ते 10 वी गौरी लोणीकर (प्रथम),नंदन नावंदर (द्वितीय),समिक्षा जाजु (तृतीय),हर्षदा चौधरी (उत्तेजनार्थ), समुहनृत्य गट 1 ली ते 4 थी कै.प्रमोदजी महाजन इंग्लिश स्कुल (प्रथम),योगेश्वरी नुतन विद्यालय प्रशांतनगर, (द्वितीय),कर्तव्य मतीमंद विद्यालय (तृतीय),घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय (उत्तेजनार्थ) समुह नृत्य गट 5 वी ते 7 वी सृजण प्राथमिक विद्यालय, चनई (प्रथम ),योगेश्वरी नूतन माध्यमिक विद्यालय,मंदिर विभाग (द्वितीय),योगेश्वरी नुतन विद्यालय मेडीकल परिसर, (तृतीय),वसंतराव काळे पब्लिक स्कुल (उत्तेजनार्थ), समुह नृत्य गट 8 वी ते 10 वी न्यु व्हिजन पब्लिक स्कुल (प्रथम),योगेश्वरी नुतन माध्यमिक विद्यालय,परळी रोड (द्वितीय),जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय (तृतीय), सिनर्जी नॅशनल इंग्लिश स्कुल (उत्तेजनार्थ) हे स्पर्धक तालुकास्तरीय बालझुुंबड- 2020 चे विजेते ठरले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन समन्वयक राजेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.आनंत कांबळे यांनी मानले.अत्यंत नेटक्या,देखण्या व दिमाखदार पद्धतीने बालझुंबडचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला अंबाजोगाई शहरातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षक,स्पर्धक विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.