Offer

बाप से बेटी सवाई,स्व.गोपीनाथजी मुंढे साहेबांना जमलं नाही ते पंकजाताई मुंढे यांनी करुन दाखवलं, बांगरवाडा येथे रास्ता दिला―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―स्वातंत्योतर भारतात बीड शहरा पासुन १६ कि.मी.अंतरावर असणारे परंतु दळणवळणाच्या साधनापासुन दुर उपेक्षित बांगरवाडा गावाला जणुकाही वाळीत टाकण्यात आले होते.
१५ घरांचा उंबरठा असणारे ,अंदाजे ७० च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या गावात बांगर , ढाकणे आडनावे असणारी जास्त लोकं. बहुतांश नोकरीच्या शोधात बाहेर असलेली , पुणे मुंबई सह सैन्य भरती झालेली. पिंपरनई गुप ग्रामपंचायत अंतर्गत २ सदस्य बांगरवाडा गावचे लक्ष्मणभाऊ बांगर आणि आशाबाई बांगर.

बीड जिल्ह्यातील एस टी ने पाहिलेलं गाव म्हणुन ओळख

बीड जिल्ह्यातील बीड शहरापासून १६ की.मी. असणारे परंतु रस्ता नसल्यामुळे एस.टी. न पाहीलेलं गाव म्हणुन हेटाळणी व्हायची.

पंधरा वर्षांपासून गावातील शाळा बंद

गावात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने १५ वर्षांपूर्वी गावात भरणारी जि.प.प़ां शाळा बंद पडली.मुलांना ४ कि.मी.पायपिट करत पिंपरनई येथे जावे लागते.किंवा बीड शहरात.

शिव व्याख्याते आणि लोकनेते गोपीनाथजी मुंढे यांचा पोवाडा गाणारे अशोक बांगर याच गावचे भुमिपुत्र

१४ ऑगस्ट २०१७ मधे बांगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आवाहन केले होते की बांगरवाडा येथे चारचाकी गाडी घेऊन येणारास १ लाख रु.बक्षिस देण्यात येईल.यापंकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या सह तत्कालिन महाराष्ट्र १ न्युज वाहिनीचे जिल्हाप़तिनिधि सुरेश जाधव यांनी पंत्यक्ष जिल्हाधिकारी नवलकीशोरजी राम यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते.त्यानंतर गावचे माजी सरपंच लक्ष्मणभाऊ बांगर आणि डॉ.अभय वनवे यांनी मुंबई पयंत पाठपुरावा करत ना.पंकजाताई मुंढे यांच्याकडुन २ कोटी ५० लाख रु.निधि दिला.

लोकनेते गोपीनाथजी मुंढे साहेबांना जमलं नाही ते पंकजाताई यांनी केले गावाला रस्ता दिला― लक्ष्मणभाऊ बांगर ( माजी सरपंच व विद्यमान गां.पं.सदस्य पिंपरनई )

मुंढे साहेबांना वारंवार सांगुनही रस्ता होत नव्हता. आश्वासनं दिली जात होती परंतु रस्ता. होत नव्हता.अखेर पाठपुराव्यामुळे ना.पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रु.निधि दिला.ताईंचे उपकार निदान या जन्मात तरी फिटणार नाही.

आता गावात जि.प.शाळा भरायला हवी―डॉ.गणेश ढवळे

रस्ता नसल्यामुळे बांगरवाडा येथे भरणारी शाळा पंधरा वर्षांपूर्वी बंद झाली होती परंतु आता पंकजाताई मुंढे यांनी रस्ता उपलब्ध करून दील्यामुळे गावात शाळा भरवुन मुला_मुलींची ४ की.मी.शाळेसाठी होणारी पायपीट थांबवावी असे लेखी निवेदन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले आहे.

गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचा रस्ता करुन वाट लावली― ग्रामस्थ

७० वषांनंतर पंकजाताई मुंढे यांनी रस्ता दिला खरा.परंतु मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेल्या २ कोटी ५० लाख रुपये निधीची शिव कन्स्ट्रक्शन या गुत्तेदाराने अतिशय बोगस काम करुन रस्तयाची पार वाट लावली आहे. एकुण ५:६ कि.मी.लांबीचा रस्ता .एकुण रस्त्याची कींमत २ कोटी ५० लाख रू असुन ५:२ डांबरीकरण व ०:२० की.मी. सिमेंट कांक़ीट रस्ता आहे. ४ महिन्यात च रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.सिमेंट रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. पहील्या पावसाळ्यात रस्ता वाहुन जाण्याची शक्यता आहे.तसेच डांबरी रस्ता फारच अरुंद आहे. गुत्तेदार आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड विभागातील अधिकारी यांनी आर्थिक लाभातुन संगनमताने अनियमितता व बोगस काम केले आहे.


Back to top button