कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

#CoronaVirus बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शिधापत्रिकाधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांचे साठी आवाहन

बीड,दि.२१:आठवडा विशेष टीम― रेशन कार्ड ( शिधापत्रिका ) पोर्टेबिलिटीसाठी दुकानदारांच्या अंगठ्याचा सॉफ्टवेअरमध्ये बंद करण्यात आला आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे रेशन कार्ड धारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य मिळवू शकतो. परंतु रेशनकार्ड धारक अजूनही अंगठा वापरुन रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात.
परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जेव्हा कार्ड धारकाचा अंगठा वापरला जातो तेव्हा स्वस्त धान्य दुकान मालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की अंगठा साबणाच्या पाण्याने किंवा सेनिटायझर व्यवस्थित स्वच्छ केला गेला आहे.


Back to top button