जालना:आठवडा विशेष टीम― कोरोना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेशातील कामगारांना जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात विशेष श्रमिक ट्रेनने परत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आज रविवारी (दि.१०) सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
या कालावधीमध्ये केवळ दवाखाने, मेडीकल, अत्यावश्यक सेवा, ज्या कामगरांना परत जाण्यासाठी तहसील मार्फत पासेस देण्यात आलेल्या आहेत, तसेच अत्यावश्य सेवेतील पासेस धारकांनाच सुट देण्यात आली आहे.