अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा परिषदेच्या वतीने ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपास सुरूवात केली आहे.अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्हा परिषदेच्या फंडातून जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या सूचनेवरून आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवाजीराव सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जोगाईवाडी जिल्हा परिषद गटात काळवटी तांडा या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या 10 ऊसतोड मजुर कुटुंबियांना
जीवनावश्यक वस्तू कीट वाटप करून सोमवार,दि.11 मे रोजी करण्यात आला.यावेळी शिवाजीराव सिरसाट,जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्री बालासाहेब शेप,प्रा,प्रशांत जगताप,श्री.पटेल,गटविकास अधिकारी संदीप घोणसीकर,काळवटी तांडा गावच्या सरपंच सौ.कमलताई चव्हाण,उपसरपंच सुरेश आडे,ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव,आण्णासाहेब राठोड,माणिक आडे,ग्रामसेवक ए.एम.लाखे,अजित चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती होती.यावेळी फिजीकल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
ऊसतोड कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य करणार
आमचे नेते पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात स्वगृही परतलेल्या ऊसतोड मजुर,कामगार बांधवांना सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत.जिल्हा परिषदेच्या फंडातून जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटपाचा शुभारंभ सोमवार पासून करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहून,लॉकडाऊन व कोरोनाच्या संकटकाळी सर्व समाज घटकांना दिलासा देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
―सौ.शिवकन्याताई सिरसाट (अध्यक्षा,जिल्हा परिषद,बीड.)