आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा राजकिशोर मोदींकडून सत्कार

आठवडा विशेष|प्रतिनिधी
अंबाजोगाई :अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अाण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांनी अंबाजोगाईत सदिच्छा भेट दिली असता त्यांचा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.प्रारंभी त्यांनी एस.टी. आगारासमोरील अाण्णासाहेब पाटील चौकातील नामफलकाला अभिवादन केले.

शहरातील सहकार भवन,प्रशांतनगर येथे अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या मुख्यालयास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अाण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अाण्णासाहेब पाटील यांनी मंगळवार, दि.5 फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी ना.नरेंद्र पाटील व त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे,बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदुलाल काकडे,युवक जिल्हाध्यक्ष किशोर गिराम पाटील यांचा फेटा बांधुन शाल व पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार केला.यावेळी नरेंद्र पाटील यांनी अंबाजोगाई पिपल्स कॉ-ऑप.बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती घेतली. अल्पावधीत बँकेने केलेला विस्तार, लेखापरिक्षणातील ऑडीट ‘अ’ वर्ग व ग्राहकांचा मिळविलेला विश्वास या बाबत समाधान व्यक्त करून बँकेच्या कार्याचे कौतुक केले.या प्रसंगी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक

महादेव आदमाने, नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक

अमोल लोमटे,वाजेद खतीब,पत्रकार प्रकाश लखेरा,संजय पांडे, सचिन चव्हाण,दादा केकाण,सोपानबापु कदम,शेख मुक्तार,रोहन कुरे,अमरदीप सोळंके, शेख अकबर

यांच्यासहीत बँकेचे संचालक,अधिकारी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


ना.नरेंद्र पाटील यांच्यामुळे मराठा उद्योजकांना पाठबळ मिळाले-राजकिशोर मोदी

वडील आण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगारांचे लढावू नेते होते.वडीलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत महाराष्ट्रातील तमाम मराठा तरूणांना व उद्योजकांना पाठबळ देण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सातत्याने केले आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा माथाडी कामगारांना न्याय देण्याची भूमिका असो या बाबत सातत्याने प्रभावी कार्य करून नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शेतकरी व माथाडी कुटुंबातील मराठा समाज बांधवांना सहकार्य केले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ ही समाजसेवी संघटना सातत्याने मराठा समाजाच्या व बहुजन समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी कार्य करते.मा.नरेंद्र पाटील हे मराठा समाजातील लोकमान्य युवानेतृत्व आहे या नेतृत्वाच्या पाठीशी साजाने खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन करून या संघटनेला आपण यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य करणार असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील मराठा तरूणांना आर्थिक पाठबळ मिळावे अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली.


राजकिशोर मोदीं कडून मराठा समाजाला न्याय देण्याचे कार्य-ना.नरेंद्र पाटील

बीड जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना तसेच सहकार क्षेत्रात अंबाजोगाई पिपल्स बँक,योगेश्वरी पतसंस्था,योगेश्वरी मल्टीस्टेट,सावित्रीमाई फुले महीला नागरी पतसंस्था व श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आदी संस्थांच्या माध्यमातून काम करणारे राजकिशोर मोदी यांनी सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची व मराठा समाजातील तरूण उद्योजकांना तात्काळ कर्ज देवून आर्थिक सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे भूमिका घेतली आहे. संस्थेच्या विविध पदांवर मराठा समाजातील कर्तबगार लोकांना काम करण्याची संधी दिली आहे.18 पगड जाती- धर्म व सर्व समाज बांधवांना सोबत घेवून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या भुमिकेतुन राजकिशोर मोदी हे जिल्ह्यात व अंबाजोगाई शहरात प्रभावीपणे कार्य करीत आहेत.अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेचे सहकार्य या पुढे ही राजकिशोर मोदी यांना राहिल.अशी ग्वाही अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button