सोयगाव: खून प्रकरणी ‘त्या’ चौघांना पोलीस कस्टडी , कंकराळा येथील घटना

सोयगाव,दि.२३:आठवडा विशेष टीम―
शेतीचा जुना वाद आणि सामाईक पाईपलाईनवरील जळलेल्या वीजपंपाच्या कारणावरून माळेगाव(पिंपरी)ता.सोयगाव येथील चौघांनी कंकराळा येथील शेतकऱ्याला घरासमोरच उचलून रस्त्यावर आदळल्या प्रकरणी झालेल्या खून प्रकरणात अटक केलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची सोमवार दि.२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
कंकराळा ता.सोयगाव येथील शेतकरी पदमसिंग महारु राजपूत(महेर)याला त्याच्या घरासमोर जावून चौघांनी उचलून रस्त्यावर आदळल्याने यामध्ये त्याच्या मेंदूला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला.मयताचा मुलगा जयसिंग परदेशी याने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संजय धना परदेशी,सागर संजय परदेशी,अमोल संजय परदेशी,सुनील परदेशी(सर्व रा.माळेगाव पिंपरी)व संग्राम ईश्वर परदेशी(रा.कंकराळा)या चौघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी वरील चौघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी तातडीने भेट देवून घटनेचा पंचनामा केला असून औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,सागर गायकवाड,अविनाश बनसोडे,विकास लोखंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे शांताराम सपकाळ,विष्णू ढाकणे आदींचे पथक पुढील तपास करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *