मुंबई दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड मधून भाजपच्या प्रितमताई मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.तर पार्थ अजित पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.अमोल कोल्हे – शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र अद्यापही नगरमधील उमेदवाराच नावं जाहीर करण्यात आलेलं नाही.
Nationalist Congress Party releases list of 5 candidates for upcoming Lok Sabha elections. Parth Ajit Pawar to contest from parliamentary constituency of Maval in Pune district.
— ANI (@ANI) March 15, 2019
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली होती.त्यामध्ये पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कोल्हापुरातून धनंजय महाडिक, परभणीतून राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कल्याण येथून बाबाजी पाटील,जळगावमधून गुलाबराव देवकर, बुलडाणा येथून राजेंद्र शिंगणे आणि लक्षद्वीप साठी मोहम्मद फैजल यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती.
