Offer

संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्णरत्न पुरस्कारांचे 18 फेब्रुवारी मंगळवार रोजी वितरण

पत्रकार परमेश्वर गित्ते,समाजसेवक शाम सरवदे,मुख्याध्यापक धनंजय शिंदे,कलावंत अभिजीत जाधव यावर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या “सुवर्णरत्न” पुरस्कारांचे वितरण यावर्षी मंगळवार,दि.18 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे.यावर्षी हे पुरस्कार परमेश्वर गित्ते(पत्रकारिता),शाम सरवदे (सामाजिक),धनंजय शिंदे (शिक्षण),अभिजीत जाधव (कला) यांना जाहिर झाले आहेत.तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाहक प्रा.कैलास भागवत चोले यांनी केले आहे.

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत कार्य करणा-या व्यक्तींना दरवर्षीच सुवर्णरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी मंगळवार,दि.18 फेब्रुवारी 2020 रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.सोबतच एस.बी.एस.स्कूलच्या स्नेह संमेलनानिमीत्त सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून समाजसेवक
गौतमभाऊ खटोड (बीड) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे (नगरसेवक, न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून केशवदादा आंधळे (माजी आमदार, चौसाळा),राहुल धस (उपविभागीय पोलिस अधिकारी),सविताताई लोमटे (उपनगराध्यक्ष,न.प.अंबाजोगाई),दगडूदादा लोमटे (सामाजिक कार्यकर्ते),रंगनाथ राऊत
(गटशिक्षणाधिकारी,पं.स.अंबाजोगाई),विशाल जाजू (सामाजिक कार्यकर्ते) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी संपादक परमेश्वर गित्ते,समाजसेवक शाम सरवदे,मुख्याध्यापक धनंजय शिंदे,कलावंत अभिजीत जाधव या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार-2020 देवून सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवार,दि.18 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.रेखाताई सुभाष बडे, उपाध्यक्षा सौ.रत्नमाला अशोक लांब,सचिव प्रा.कैलास भागवत चोले,शाळेच्या मुख्याध्यापिका
श्रीमती आर.एस.बडे,सांस्कृतिक विभागप्रमुख अर्चना नवनाथ क्षीरसागर व संकल्प विद्या प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button