पोलीस भरती

औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२ रुग्णांची वाढ ;एकूण १३६२ कोरोनाबाधित

औरंगाबाद दि.२७:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1362 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापूर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1), जुना बाजार (1), जहागीरदार कॉलनी (2), ईटखेडा परिसर (1),जयभीम नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), सुभाषचंद्र बोस नगर (4), अल्तमश कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी एन-9 (1), टिळक नगर (1), एन-4 सिडको (1), रोशन गेट परिसर (1), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), भाग्यनगर (1), जय भवानी नगर (3), बीड बायपास रोड (1), समता नगर (1), सिल्लोड (1), रमा नगर, कन्नड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.
यामध्ये 10 महिला आणि 22 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 867 जण कोरोनामुक्त

औरंगाबाद शहरातील मनपाच्या कोविड केअर केंद्र असलेल्या एमजीएम स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथून आठ, एमआयटी मुलांचे वस्तीगृह येथून नऊ, किल्लेअर्क येथून 14, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) सहा, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 12, खासगी रुग्णालयातून सात असे एकूण 56 कोरोनाबाधित रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून 867 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असे मनपा प्रशासनाने कळवले आहे.
*घाटीत तीन, खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत औरंगाबाद शहरातील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनीतील 38 वर्षीय पुरूष आणि रहीम नगर येथील 55 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात मकसूद कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष, मानक नगर, गारखेडा परिसर, विजय नगर येथील 76 वर्षीय महिला आणि रोशन गेट येथील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयात आतापर्यंत सात, घाटीत 56 आणि मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 64 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *