अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलीत,टी.बी. गिरवलकर पॉलिटेक्निक
यांच्याकडून बीड व लातूर जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अनेक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांच्या नियोजनानूसार पॉलिटेक्निकने विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाबाबतचे महत्व व इयत्ता 10 वी नंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेशाच्या उपलब्ध संधीची माहिती दिली.यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॉलिटेक्निकचे प्राचार्य एम.बी.शेटटी,प्रा.आर.पी. नेलवडे,प्रा.व्हि.व्हि.रावबावले,
प्रा.डी.एम.कांबळे,प्रा.अब्दुल हलिम,प्रा.श्रीमती ए.एस. कुलकर्णी,प्रा.शेख हबीब,प्रा. एस.एस.कंगळे,ग्रंथपाल आर.बी.चव्हाण यांनी या तंत्रशिक्षण मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.