पोलीस भरती
Beed

आपत्ती व्यावस्थापन आराखड्यासाठी बैठकावर बैठका पण बिंदुसरा नदीपात्रातील पुर क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाचे काय? :- डॉ.गणेश ढवळे

मान्सुन कालावधीत पुर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन गाव,तालुका पातळीवर परीपुर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तालुका स्तरावर आधिका-यांची बैठक घेऊन संबंधित कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करते.मात्र बीड शहरातील बिंदुसरा नदिपात्रातील ‘फ्लड झोन (‘पुर नियंत्रण रेषा) मध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकाम व नदीपात्रात उगवलेल्या बाभळीमुळे नदीपात्र अरूंद झाले असुन याच झाडांना पाणी अडुन पाणी शहरात शिरण्याची दाट शक्यता आहे.यापुर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत मात्र नगरपालिका व जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
वारंवार निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत त्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे बिंदुसरा नदीपात्रात भराव घालून नदीपात्राचे मैदान करून ओढे चक्क बुजवून नदीचा प्रवाह वळवुन करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणात ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व रामनाथ खोड यांनी केली आहे.

पुरक्षेत्रातील बांधकामांना परवानगी देऊ नये मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी

महापुर येण्यास पुरक्षेत्रातील अतिक्रमणे, अवैध बांधकाम कारणीभूत असुन त्यामुळे पुरबाधित क्षेत्र असलेल्या’ ब्लु’ आणि’ रेड ‘झोनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या असुन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बिंदुसरा नदिपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका
—-
बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा पात्रानजीक अतिक्रमण व नियमाप्रमाणे राहणा-या तब्बल ३०० घरांना महापुराचा धोका असुन नगरपालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही.पुराचे पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे.यापुर्वीही अशा दुर्घटना घडुन वित्त व जिवीतहानी झालेली आहे.शहरातील मोमीनपुरा, खासबाग,जुना मोंढा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पेठबीड या भागात पुर आल्यानंतर जास्त धोका असतो.त्यांची नेहमीच तारांबळ उडते.

नगरपरिषद व जिल्हा प्रशासन बेफिकीर:- रामनाथ खोड
—-
बीड शहरातून वाहणाऱ्या नदी आणि ओढ्यांवरील अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते करतात, त्यासाठी आम्हाला धमक्या देखील मिळाल्या आहेत.वास्तविक नदी,नाले संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची आहे मात्र प्रशासन व अधिकारी संगनमताने आम्हालाच अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसुन येत आहे.

बीड शहरातील नदी,ओढे यांचे सर्व्हेक्षण गरजेचे:- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड शहरातील नदी, ओढे,नाले यांच्यावर राजकीय पुढारी, कार्यकर्ते, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड, नगररचनाकार,भुमिअभिलेख, जलसंपदा विभाग कार्यालय यांनी संगनमतानेच भुमाफियांशी आर्थिक लाभातुन हातमिळवणी करून नदी,ओढे,नाले गायब केलेले असुन त्यांचे सर्व्हेक्षण करणं गरजेचं आहे.सर्व्हेक्षण नसल्याने रेडफ्लर्ड लाईन व ब्लुफ्लर्ड लाईन हा पट्टा ठरविण्यात आला नसल्याने नगरपरिषद प्रशासन याचा गैरफायदा घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *