पेनेक्स फाऊंडेशन तर्फे ‘पालखी केअर’ उपक्रम; पालखी मिरवणुकीत वारकऱ्यांना देणार मोफत वैद्यकीय सेवा

पुणे(प्रतिनिधी): पेनेक्स फाउंडेशनतर्फे तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी मिरवणुकीत विनामूल्य वैद्यकीय सेवा करण्यासाठी ‘पालखी केअर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

डेक्कन, शनिवार पेठ आणि पुणे स्टेशनसह पालखी मार्गावर येणाऱ्या पेनेक्स फाउंडेशनच्या क्लिनिकमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून या उपक्रमामुळे वारकऱ्यांना अत्यावश्यक वैद्यकीय सहाय्य मिळणे सोपे होईल. यावेळी फिजिओथेरपीसह पायदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी आणि टाचदुखी अशा वेदनांवर आराम देणारे उपचार आणि औषधे यांचा समावेश असेल. अनेक दिवस पायी प्रवास केल्याने वारकऱ्यांना शारीरिक वेदना जाणवतात. अशावेळी ह्या उपक्रमातून वारकऱ्यांना मदत करण्याचे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवेची नियमित उपलब्धता असतेच असे नाही, यासाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे. बहुतांश वारकरी पालखीसोबत पायी चालतात आणि अनेकदा त्यांना शारीरिक ताण सहन करावा लागतो. विमामूल्य आणि योग्य वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या प्रवासात मदत करणे, त्यांच्या आरोग्याशी तडजोड न करता त्यांच्या भक्तीसेवेत हातभार लावणे हे पेनेक्स फाउंडेशन ध्येय आहे.

याचा वारकऱ्यांना लाभ तसेच या उपक्रमाद्वारे मदत व्हावी हेच ध्येय आहे.

शाखा :
डेक्कन
पुणे स्टेशन
शनिवार पेठ

संपर्क – ९०६७७५३३५५ / ९०६७५७३३५५

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

कोरोना संसार्गावर मात करण्यासाठी घोसला ता.सोयगाव येथे सर्वरोग निदान शिबीर , घोसला ग्रामपंचायत आणि विघ्नहर्ता रुग्णालयाचा उपक्रम

घोसला,ता.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी घोसला ग्राम पंचायत आणि विघ्नहर्ता मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलच्या वतीने सोमवारी भव्य आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ३१० रुग्णांची विविध तपासण्या करण्यात आल्याची माहिती डॉ.भूषण मगर यांनी दिली.

घोसला ता.सोयगाव येथील सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.भूषण मगर,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,विक्रम पाटील,सरपंच सुवर्णाबाई वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या शिबिरात तब्बल ३१० जणांची विविध रोगांची तपासणी करण्यात आली होती,यामध्ये प्रामुख्याने मधुमेह,हृदयरोग,बी.पी,आदींची तपासणी करण्यात येवून घोसला गाव कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित करण्यासाठी या शिबिराचा उद्देश असल्याची डॉ.भूषण मगर यांनी सांगितले.तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४० जणांना मोफत उपचारासाठी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल मध्ये संदर्भसेवेसाठी बोलाविण्यात आले असून दहा जणांना शास्र्क्रीयेसाठी बोलाविण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच सुभाष बावस्कर,सदस्य पवित्राबाई युवरे,अलकाबाई बावस्कर,प्रतिभा गवळी,प्रतिभा पाटील,गणेश माळी,सतीश सोनवणे,सोमू तडवी,आदींनी पुढाकार घेतला होता.

विशेष सहकार्य -मराठा प्रतिष्ठानचा रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध-

मराठा प्रतिष्ठानचं रुग्णवाहिकांच्या मदतीने गावातून रुग्णांना शिबीर स्थळी आणण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या आदेशावरून मदतकार्य करण्यात आले होते त्यामुळे ग्रामस्थाच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले आहे.

कोरोना काळात मेंढपाळांना दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या-दत्ता वाकसे

बीड/प्रतिनिधी: आज संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट घोंगावत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार साहेब यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करून रानावनामध्ये आणि डोंगर-दर्‍यांमधे भटकंती करून आपली उपजीविका भागवणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना तात्काळ दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी त्याच बरोबर सध्या परिस्थिती पाहिली तर आठवडी बाजार चालू नसल्याने मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही अशा परिस्थितीत मेंढपाळांचा आर्थिक कणा कोलमडला असून दररोज पोटासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना त्यांच्या असलेल्या मेंढ्यांना चारा व माणसांना पुरेशा अन्नधान्य मिळणे कठीण आहे रानावनात फिरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना सामोरे जावे लागते महिला व मुलांच्या आरोग्याची परिस्थिती पैशाअभावी बिकट होताना दिसत आहे मेंढपाळ हा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात अशी भटकंती करत आहे परंतु या खूप मोठ्या महामारी मध्ये महाराष्ट्र सरकारने आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य सुनील केदार यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर केले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की प्रत्येक छोट्या छोट्या समूहाला पण त्या अगोदर मदत जाहीर केली आहे परंतु मेंढपाळांच्या समस्या मात्र या सरकारला दिसत नाहीत काय? असा वाकसे यांनी सवालही दिलेल्या निवेदनात त्यांनी केला आहे पुढे ते म्हणाले की तात्काळ भटकंती करणार्‍या आणि मेंढपाळ व्यवसायावर जगणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळांना तात्काळ दहा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी त्याच बरोबर त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही महाराष्ट्र सरकारने सोडवावा असे निवेदन ई-मेल द्वारे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार साहेब यांना ई-मेल द्वारे सादर केले आहे आणि जर का आपण या निवेदनावर कारवाई केली नाही तर आम्ही मेंढपाळांना घेऊन भीक मागो आंदोलन करणार आहेत असे देखील दत्ता वाकसे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

#Nivar Cyclone – निवार चक्रीवादळाच्या तडाक्यात सापडलेल्या अनेकांना डॉ राजा थंगप्पन यांच्यासह टीमचा मदतीचा हात

चेन्नई दि.२६:आठवडा विशेष टीम निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू मधील महाबलीपुरम येथे आले होते.त्यात अनेक कुटुंबांना अन्नपुरवठयाची गरज होती.त्यात एक खारीचा वाटा म्हणून डॉ राजा थंगप्पन (Dr. Raja Thangappan , Transworld Educare Pvt Ltd.) ,राजेश पिलाई (Mr. Rajesh Pillai) सह टीम ने गरिबांना मदत केली आहे.भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी झाला आहे. परंतु, तटीय भागांत जोराच्या वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस सुरू आहे. पद्दुच्चेरी, तमिळनाडू कराईकल, नागापट्टनम आणि चेन्नईमध्ये कालपासून पाऊस सुरू आहे.पावसामुळे अधिकांश भागात पाणी भरल आहे.

अतितीव्र शक्तिशाली ‘निवार’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती हवामान खात्याकडून बुधवारी रात्री उशिरा देण्यात आली होती.

ह्या चक्रीवादळाच्या तडाक्यात सापडलेल्या गोरगरिबांना अन्न वाटप डॉ राजा थंगप्पन सर ,
राजेश पिलाई ,किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकॅडमी ,दवाओ मेडिकल स्कुल फौंडेशन फिलिपीन्स सह डॉ डेविड पिलाई सर यांच्या संपूर्ण टीम ने तामिळनाडू येथील महाबलीपुरं येथे निवार चक्रीवादळग्रस्थांना जेवण वाटप केले आहे.त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे अनेक जणांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे.

बीड: परळी-अंबाजोगाई रस्त्यावर आता आझाद चौक ते कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत होणार चौपदरीकरण

चौपदरी रस्त्याची लांबी दोन किमी वाढविण्याचे मुंडेंचे निर्देश

परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचेही होणार चौपदरी रुंदीकरण

मुंबई दि.२५:आठवडा विशेष टीम― बहुप्रतिक्षित परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर असून, परळी शहरातील मौलाना आझाद चौक ते सपना हॉटेल इथपर्यंत मूळ आराखड्यानुसार चौपदरी रस्ता प्रस्तावित आहे, या परिसरातील रहदारीचा विचार करत चौपदरी रस्त्याची लांबी आणखी दोन किलोमीटर वाढवून कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत करण्याचे निर्देश आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

परळी – अंबाजोगाई रस्त्याच्या कामाची गती वाढविणे व अन्य रस्त्यांच्या कामांसंदर्भात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गचे सचिव विनयकुमार देशपांडे, कार्यकारी अभियंता स्वामी, सहसचिव रहाने, संबंधित एजन्सीचे कंत्राटदार आदी अधिकारी उपस्थित होते.

परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने लहान पडत असून या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याचीही आवश्यकता असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात याव्यात असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

अंबाजोगाई रस्त्यावर येणाऱ्या कन्हेरवाडी गावात नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास होऊ नये यासाठी येथे रेक्युलर अंडरपास बांधण्यात यावेत असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी संबंधित यांना या बैठकीत दिले आहेत.

दरम्यान परळी ते अंबाजोगाई या रस्त्याचे आझाद चौकापासून चौपदरीकरण आणखी दोन किलोमीटर वाढवत कण्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत वाढवून, परळीच्या बाजूने अधिक वेगाने काम करण्यात येणार असून, श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

डॉ.ढवळेंच्या वाढदिवसानिमित्त देवराई ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने लिंबागणेश भालचंद्र गणपती मंदिर परिसरात वृक्षारोपण, खाकी वर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रेंची प्रमुख उपस्थिती

बीड:आठवडा विशेष टीम― सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवराई ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती मंदिर परिसरात वड, पिंपळ, कडुनिंब, आदि, वृक्षारोपण करण्यात आले यावेळी खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस ठाणे यांची त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रमुख उपस्थिती होती.

देवराई ट्रेकिंग ग्रुप बीड व्यावसायाने बहुतांश शिक्षक असलेल्या या ग्रुप पर्यावरणप्रेमी सदस्यांच्या वतीने बीड शहराच्या आसपास डोंगररांगात नित्यनेमाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, तसेच विविध वनस्पतींच्या औषधीय गुणधर्म यांच्या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येते, देवराई ट्रेकिंग ग्रुप मधिल सदस्य डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त भालचंद्र गणपती मंदिरात वड, पिंपळ, आदि, वृक्षारोपण करण्यात आले,

खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती –डॉ.गणेश ढवळे

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मांडवखेल येथे पाणी फाऊंडेशनच्या शिवारफेरीत बीजरोपन, वृक्ष लागवडीची पाहणी करताना वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस ठाणे यांनीयांनी नेकनूरसह रत्नागिरी, भंडारवाडी, कपिलधार,मांजरसुंभा, , चाकरवाडी, येथील ओसाड डोंगरावर ” बिजांकुर” वृक्षप्रेमी ग्रुप ऊभारून ग्रामस्थांसह १ लाख बिजांचे रोपन, पार पाडत नेकनूर येथील बाजारतळ, ईदगाह मैदान, चाकरवाडी रस्त्यावरील वृक्षारोपण, कपिलधार कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा तसेच सीतादेवी मंदिर परिसरात वडाच्या फांद्यासह, पिंपळ, चिंच या झाडाची लागवड केली आहे, डॉ, गणेश ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवराई ग्रुप च्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात खाकीवर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे व त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेंगडेंवाडीकरांचे रस्त्यासाठी दसऱ्याच्यादिवशी संवेदनाहीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निषेधार्थ तलावात लक्षवेधी आंदोलन

वाघिरा:आठवडा विशेष टीम― स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे होऊनही बीड जिल्ह्यातील रस्ता न पाहिलेले मेंगडेंवाडी हे एकमेव गाव असेल, वारंवार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन देऊनही कायम दुर्लक्ष करणा-या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निषेधार्थ आज दि, २५ ऑक्टोबर रोजी दस-यादिवशी या संवेदनाहीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निषेधार्थ वाघिरा साठवण तलावात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन मागणी मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा डॉ.गणेश ढवळे , सरपंच ज्ञानोबा जगदाळे, बाबासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वाघिरा ते मेंगडेंवाडी रस्ता दुरावस्थेत असुन मेंगडेंवाडी येथील शेतकरी, शाळकरी मुले, दुधधारक, भाजीपाला वितरक यांना पावसाळ्यात गुडघाभर वाघिरा साठवण तलावातील पाण्यातुन आवक जावक करावी लागते, रस्ता नसल्याने मोटार सायकल, चारचाकी वाहनांना तलावाच्या भिंतीवरून ये-जा करावी लागते, मोठ्या प्रमाणावर चिखल असल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे, बाळंतीण, साप चावलेले रुग्ण यांना दवाखान्यात नेताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते ,शाळकरी मुलांना शाळा बुडवावी लागते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे,या प्रकरणी माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भिमराव धोंडे,माजी राज्यमंत्री व सध्याचे विधानपरिषद सदस्य आहेत, सुरेश आण्णा धस, आ.बाळासाहेब आजबे , माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई गोपिनाथरावजी मुंडे आणि दि, १७/०२/२०२० रोजी मुंबईत जाऊन धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ग्रामस्थांनी दिलेले आहे. तरीही वारंवार लोकप्रतिनिधी व जिल्हा व तालुका स्तरावर तहसील प्रशासनाला वारंवार निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा प्रश्न न सुटल्याने डॉ, गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि, २५/१०/२०२० रोजी वाघिरा साठवण तलावात उतरून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. मंडळ अधिकारी राख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रशांत कदम, राजेभाऊ कदम, भिमराव बांगर, सुरेश शिंदे, दिलीप जाधव, श्रीहरी आरगुडे, हनुमान शिंदे, विनोद बोबडे, अमोल मेंगडे, शहादेव जगदाळे, चंद्रसेन कळसुले, माधव रांजवण, जगन्नाथ बोबडे, लक्ष्मण जाधव, अमोल मेंगडे आदी उपस्थित होते.

पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे दोन्ही पालकमंत्र्यांनी न्याय दिलाच नाही, बोगस रस्ते कामासाठी कोट्यावधींचा निधी मात्र मेंगडेंवाडी साठी निधी नाही –डॉ.गणेश ढवळे

पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड असताना ब्रम्हगाव ते मुगगाव ते सावरगाव घाट (भक्तीगड) या ८ किमी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ४ कोटी ४३लाख रू निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला, २महिन्यातच या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले, खडी उघडी पडली, साईडपट्ट्या मुरूमाऐवजी काळ्या मातीने भरलेल्या आहेत, खडी उघडी पडल्याने वाहने घसरून अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे, याविषयी लेखी तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नाही याचवेळी मेंगडेंवाडी सारख्या गावात रस्ता देण्यासाठी निधीचा अभाव असल्याची कारणे दिली जातात, सध्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना, धनंजय मुंडे यांना मेंगडेंवाडी ग्रामस्थांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन लेखी निवेदन दिले परंतु अद्याप न्याय मिळालाच नाही.


बीड: ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेत बेलवाडीत अनेकांची नावे मतदान यादीत

बेलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत झालेला प्रकार, लोक प्रतिनिधित्व कायदा नुसार गुन्हे दाखल असताना जिल्हा प्रशासनाकडुन, निवडणूक विभागाकडून पाठराखण, विभागीय चौकशी व कारवाईसाठी आयुक्तालयासमोर आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर रित्या ऑनलाईन मतदार नोंदणीचा गैरफायदा घेऊन २७ मे २०१८च्या निवडणुकीत बोगस मतदारांचा समावेश उदाहरणार्थ ६ मयत, बेपत्ता व्यक्ती, ११अल्पवयीन शाळकरी मुलं,४ दुबार मतदान, पुणे येथील नोकरीवर असलेले सैनिक जवान, कोकणातील मतदान ड्युटीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक, ७ लग्न होऊन सासरी गेलेल्या व तिथे नांव नोंदणी करून मतदान केलेल्या मुली, २३बाहेरील गावातील लोकांचे बोगस पद्धतीने केले मतदान आदी प्रकरणात दि, २०/१०/२०१८ रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फौ.अ.क्र.७३२/२०१८, कलम ४१६,४६५,४६८,४७३,सह १०९ भादवि प्रमाणे कलम १७,१८,३१ लोक कृत्य प्रतिनिधित्व कायदा (Represention of the people act 1950) प्रमाने सरपंच, सरपंच पती,व ईतर संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याप्रकरणी जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हा परिषद प्रशासन यांना लेखी तक्रार करून सुद्धा कारवाई न केल्यामुळे संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी व ग्रामपंचायत बरखास्तीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा ईशारा डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.
बीड तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायत २७ मे २०१८ मध्ये निवडणुकीत बोगस मतदार खालिलप्रमाणे आहेत

६ मयत मतदारांची नावे समाविष्ट
———————————————
१) चव्हाण अंकुश किसन
अनुक्रमांक १३६
मृत्यू दिनांक २०/०२/२०१८
२) विश्वांभर रामभाऊ यादव
अनुक्रमांक ४०४
मृत्यू दिनांक १३/०२/२०१८
३) निवृत्ती बाबुराव कदम
अनुक्रमांक ३४६
मृत्यू दिनांक १९/०३/२०१७
४) अर्चना भिमराव चव्हाण
अनुक्रमांक ८६
मृत्यू दिनांक २३/०५/२०१८
५) काशीबाई रामा यादव
अनुक्रमांक ४०३
मृत्यू दिनांक १६/१०/२०१७
६) अर्जुन बाबुराव चव्हाण
अनुक्रमांक ७६
मृत्यू दिनांक १३/११/२०१७

पोलीस डायरीवरती बेपत्ता नोंद असलेला–
————————————————–

मस्कर भागवत उत्तम
अनुक्रमांक २५२

दोनदा मतदान केलेले ४ मतदार
————————————-
१) कदम हनुमंत नवनाथ
अनुक्रमांक २९३ & ५३२
२) यादव वर्षा रावण
अनुक्रमांक ५१७ & ५२८
३) कदम अशोक मोहन
अनुक्रमांक ४७९ & ५११
४) खिंडकर अवधूत अर्जुन
अनुक्रमांक ५१० & ५३१
या सर्वांनी दोनदा मतदान केलेले आहे

अल्पवयीन शाळेतील मुलांचे मतदान
—————————————
१) चि, दळवे विठ्ठल नामदेव
जन्मदिनांक २५/०५/२००३
२) चि, चव्हाण हरिभाऊ कल्याण
जन्मदिनांक १४/११/२००२
३) चि, चव्हाण राहुल भिमराव
जन्मदिनांक १०/०६/२००२
४) चि, यादव समाधान रमेश
जन्मदिनांक १८/०८/२००१
५) चि, थापडे सखाराम सुखदेव
जन्मदिनांक १७/०३/२००२
६) चि, चव्हाण ऋषिकेश अंकुश
जन्मदिनांक १९/०५/२००२
७) चि, मुळे जयवंता कारभारी
जन्मदिनांक १६/०६/२००२
८) चव्हाण पवन कारभारी
जन्मदिनांक ३०/०७/२००१
९) चव्हाण पुजा कल्याण
जन्मदिनांक १२/०३/२००१
१०) खिंडकर सुदाम लक्ष्मण
जन्मदिनांक २०/०६/२००१
११) खिंडकर मुक्ता भारत
जन्मदिनांक २०/०३/२०००

कोकणातील मतदान ड्युटीवरील ग्रामसेवकाचे मतदान
———————————————–

यादव भरत विठ्ठलराव
अनुक्रमांक ४७३ , हे ग्रामसेवक असुन कोकणात मतदान ड्युटीवर कार्यरत असताना बेलवाडी ग्रामपंचायत मध्ये परस्पर बोगस मतदान केलेले आहे

पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना मतदान
———————————————–

पडघन आनिल मारोती हे पुणे येथे सैन्यदलात नोकरीवर असताना त्यांच्या परस्पर त्यांच्यानावे बेलवाडी मध्ये बोगस मतदान केलेले आहे.

बाहेरील गावातील स्थायिक लोकांच्या नावाने बेलवाडीतील रहिवासी दाखवून बोगस मतदान केलेले
———————————————–

१) बागडे गजानन मच्छिंद्र :– ईस्लामपुर बीड
२) बन्सड बन्सी देवराव :- मौजवाडी
३) चव्हाण बाबुराव सुखदेव :- इमामपुर
४) चव्हाण भिमराव शंकर:- घाटसावळी
५) चव्हाण कल्याण सुखदेव:- इमामपुर
६) चव्हाण निलावती बाबुराव:- इमामपुर
७) चव्हाण रामभाऊ सूर्यभान:- घाटसावळी
८) चव्हाण रूक्मिण सूर्यभान:- घाटसावळी
९) चव्हाण सुखदेव किसन:- नाळवंडी तांडा
१०) चव्हाण कविता अंकुश:- नाळवंडी तांडा
११) चव्हाण लक्ष्मण सूर्यभान:- पिंपळगाव घाट
१२) दळवे प्रकाश दादाराव:- कोळवाडी
१३) इंगोले सीताबाई रामभाऊ:- पाडळी
१४) जाधव सुरेश बापुराव:- बांभुळखुटा
१५) कदम गणपती मारोती:- रत्नागिरी
१६) कदम केसरबाई गणपत:- शाहूनगर बीड
१७) कुटे अभिमान राम:- बोर्ड
१८) सातपुते अर्चना सतिश:- बाभूळवाडी
१९) थापाडे गंगासागर सुखदेव:- ढेकणमोह
२०) थापाडे सुखदेव राजाराम:-ढेकणमोह
२१) वाणी बाजीराव लक्ष्मण:- आंबेसावळी
२२) यादव ज्ञानदेव निवृत्ती:- वांगी
२३) यादव शहादेव तुकाराम:- वांगी

वरील प्रकरणी जिल्हाधिकारी बीड, राज्य निवडणूक आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद बीड, तहसीलदार बीड यांना लेखी तक्रार दाखल करण्यात येऊन सुद्धा अद्याप कारवाई न केल्यामुळे दि, २ नोव्हेंबर २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

बेलवाडी ‘मनरेगा अपहार’ प्रकरण ; सोशल मिडियावर डॉ गणेश ढवळेंची नाहक बदनामी करणाऱ्या पोस्ट ,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

बेलवाडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत कामात ६० लाखांचा अपहार, विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार , सोशल मीडियावर बदनामी केली,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार , अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – डॉ गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सुरू करण्यात आली मात्र स्थानिक पुढारी यांनी वरिष्ठांच्या वरदहस्ताने शासकीय आधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमताने बोगस मजुर दाखवून व बनावट दस्तऐवज तयार करुन लाखो रूपयांचा अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, रोहयो मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना केली असून संबंधित प्रकरणी कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.

कामाचे नाव वर्क कोड नंबर रक्कम
१)बांधबंदिस्ती १ते ३९ वर्क कोड नंबर १७६८४३, रक्कम २२ लाख ५७ हजार ९९८ रूपये
२) बांधबंदिस्ती ५५ ते १४० वर्क कोड नंबर १७६८४२, रक्कम २२ लाख, ४९ हजार, ७७३ रूपये
३) बांधबंदिस्ती नविन वर्क कोड नंबर १२३४८३७१०५, रक्कम ७ लाख रुपये ६७ हजार १४४ रूपये
४) वृक्षसंगोपन बेलवाडी कोड नंबर १२३४८३७१०५ रक्कम ३ लाख ३५ हजार ५५० रूपये
५) वृक्षसंगोपन वर्क कोड नंबर १२३४८३७१०६ रक्कम २ लाख ३९ हजार ९१५ रूपये
६) शोषखड्डे बेलवाडी वर्क कोड नंबर ४७३४११२३८/४७३४११२३९/४७३४११२४८ रक्कम २ लाख १९ हजार रुपये
७) जलसिंचन विहीर बेलवाडी, वर्क कोड नंबर ४७३४४६९७१ रक्कम १ लाख ८७ हजार रुपये, अशाप्रकारे एकुण ६० लाख ३७ हजार ३८० रुपयांचा अपहार बोगस मजुर व दस्तऐवज दाखवून संगनमताने शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा डॉ गणेश ढवळे यांचा आरोप आहे.

बांधबंदिस्ती एकाच कामाचे एकाच आठवड्यात ४ मस्टर, एकही मजुर उपस्थित नसताना ३८७ बोगस मजुर दाखवले

बेलवाडी गावामध्ये गट क्रमांक १ ते ३९ व गट क्रमांक ५५ ते १४० अशी दोन बोगस कामे कागदोपत्री केल्याचे दाखवले आहे व दोन्ही कामावर दिनांक २६/०४/२०१९ ते ०१/०५/२०१९ या आठवड्यात गट क्रमांक १ते ३९ वरती एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत.
१) मस्टर क्रमांक २०९९-५० मजुर
२) मस्टर क्रमांक २१००-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२१०१-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२१०२-४३ मजुर या कालावधीत एकुण १९३ मजुर दाखवले आहेत.

२) बांधबंदिस्ती गट क्रमांक ५५ते १४० या कामावरती दि, २६/०४/२०१९ते ०१/०५/२०१९ या कालावधीत एकाच कामावर ४ मस्टर काढलेले आहेत
१) मस्टर क्रमांक २०९२-५० मजुर
२) मस्टर क्रमांक-२०९३-५० मजुर
३) मस्टर क्रमांक-२०९४-५० मजुर
४) मस्टर क्रमांक-२०९५- ४४ मजुर असे एकूण १९४ मजुर दाखवले असल्याचा डॉ ढवळे यांचा आरोप आहे.
एकाच कामावर व एकाच आठवड्यात ४ मस्टर कसे काय काढले? प्रत्यक्षात एकही मजुर उपस्थित नसताना या आठवड्यात एकुण ३८७ बोगस मजुर दाखवून लाखो रुपये हडप केले आहेत.

२० वर्षापुर्वीची जलसिंचन विहीर नविन खोदल्याचे दाखवून अपहार
२० वर्षापुर्वीची विहीर नविन जलसिंचन विहीर खोदल्याचे दाखवून १ लाख ८७ हजार रूपये निधीचा अपहार करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – डॉ.गणेश ढवळे

संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन अपहारीत रक्कम शासन दरबारी जमा करण्यात यावी, बोगस मजुरांची नावे यादीत असून बंदिस्त जागेत वैयक्तिक रित्या रोहयो मजुरांचे जवाब नोंदवावेत म्हणजे खाते कोणी उघडले, मजुरांच्या नावावरील पैसे कोणी परस्पर उचलले याचा उलगडा होऊल, याप्रकरणात स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आणि पंचायत समिती मधिल गटविकास आधिकारी, विस्तार आधिकारी, इंजिनिअर, एपीओ, डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संगनमताने अपहार केल्यामुळे संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांची डॉ गणेश ढवळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार तसेच अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

बेलवाडी नरेगाच्या कामातील अपहार प्रकरणात कारवाई करण्यासाठी डॉ गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यामुळे सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सरपंचपती व त्यांच्या सहकाऱ्यां विरोधात पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार केली असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

बीड नगरपालिकेला महिलांसाठी शौचालय बांधण्याची आवश्यकताच वाटत नाही ,महिला व बालकल्याण मंत्र्यांना लेखी तक्रार – डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील नगररोड वरील निर्माणाधीन शौचालय बांधकाम केवळ पुरूषांसाठी व्यवस्था नसुन महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होत असून याप्रकरणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,
नगररोड वरील शौचालये बांधकाम हे केवळ पुरूष वर्गासाठी असुन महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नाही, बीड शहरातील धानोरा रोडवरील, चंपावती शाळेसमोर, पंचायत समिती समोर, निलकमल हॉटेल शेजारी, तसेच सध्या भाजी मंडई भरत असलेल्या बसस्थानका मागील बायपास रोडवरील निर्माण होत असली शौचालये केवळ पुरूष वर्गासाठी व्यवस्था केलेली आहे, नगररोड वर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, न्यायालय, आदि शासकीय कार्यालये आहेत, याठिकाणी पुरूषांसोबत महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे याठिकाणी पुरूषांसोबत महिलांची व्यवस्था करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्तांना लेखी तक्रार केली आहे.

डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई ; कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी – डॉ ढवळे

डॉ राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई, कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्तांना लेखी तक्रार ― डॉ. गणेश ढवळे

बीड दि.१०:आठवडा विशेष टीम― डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी ज्या क्लिनिक मध्ये कोविड-१९ संभाव्य रूग्ण तपासणी कक्ष स्थापन करणायाचे लेखी पत्रक आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत दिले होते त्याच दवाखान्याची अनधिकृतपणे चालवत असल्याबद्दल पोलीस यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणेमार्फत चौकशी करून बदनामीचे षडयंत्र डॉ.अशोक थोरात (जिल्हा शल्य चिकित्सक) , डॉ. राधाकिसन पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ.प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी रचले असल्याचे डॉ गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.

आरोग्य यंत्रणेतील या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधातील तक्रार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केल्यामुळे षड्यंत्र सूडबुद्धीने रचले याविषयी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि. ०८/०९/२०२० रोजी डॉ. प्रतिभा रकटे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश) यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी डॉ.कासट एन.डी. यांना जा क्र/जिआअकाबी/आस्था/९५७/२०२० जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बीड दिनांक ०८/०९/२०२० रोजीच्या पत्रावरून डॉ. गणेश ढवळे अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याबद्दल तात्काळ चौकशी करून कार्यवाही करणेबाबत सांगितले होते. त्यामध्ये डॉ.गणेश ढवळे यांच्या नर्सिंग होम मध्ये अनाधिकृत औषधसाठा आहे व अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याचे म्हटले आहे.

दवाखाना अनधिकृत असेल तर कोविड कक्ष स्थापन करण्यासाठी लेखी पत्रक दिले कसे?

सर्वात प्रथम डॉ.गणेश ढवळे यांचे “दिपक क्लिनिक” आहे.नर्सिंग होम नाही दुसरी गोष्ट जर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे क्लिनिक अनाधिकृत असेल तर डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी स्वतः च्या सहीनिशी कोविड कक्ष स्थापन करण्यात यावे असे लेखी पत्रक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना डॉ.गणेश ढवळे यांच्या क्लिनिक मध्ये का पाठवले? असा प्रश्न निर्माण होतो.

डॉ.गणेश ढवळे यांच्या दिपक क्लिनिक मध्ये अनाधिकृत औषधीसाठा असेल तर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी जप्त करून गुन्हा दाखल का केला नाही???

डॉ.गणेश ढवळे यांची पदवी बी.ए.एम.एस. (Bachelor of Ayurveda, Medicine, and Surgery) असुन रजिस्ट्रेशन नं I-36149-A-1 आहे. त्यांच्या रजिस्ट्रेशन दिनांक ०६/०५/२०२४ पर्यंत आहे.दिनांक ०२/०९/२०२० पासुन १५/०९/२०२० पर्यंत लिंबागणेश संपूर्ण गावात संचारबंदी होती.त्यामुळे बीडवरून आवक-जावक करणारे लिंबागणेश येथिल औषध दुकानदार व खाजगी डॉक्टर यांचे येण्या-जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे व स्वतः डॉ ढवळे स्थानिक असल्याने आवश्यक औषधीसाठा ठेवला होता.ज्यामध्ये आक्षेपार्ह गर्भपातासारखी कुठलीही औषधे नव्हती. त्यामुळे रामेश्वर डोईफोडे यांनी कोणतेही औषध जप्त न करता गुन्हा दाखल करण्यात आला नाही.खाजगी डॉक्टर रूग्ण तपासण्यात कुचराई करत असताना डॉ गणेश ढवळे यांनी रुग्णसेवा देत कर्तव्य बजावले आहे.


सूडबुद्धीने कारवाई करण्याचे कारण ‘वरीष्ठांना केलेली लेखी तक्रार’ ―डॉ.गणेश ढवळे

‘डॉ.रकटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात वारंवार गैरहजर असतात, परिचारिका कडून रूग्णांना उपचार घ्यावे लागतात’ याविषयी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि, १८/०३/२०२० रोजी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री ,आयुक्त यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार केली होती. त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बीड जाक्रजिपबी/आदि/आस्था/-१/कावि-/ ६७९/१९ पत्रक दि. २०/०३/२०२० अन्वये दि. २०/०३/२०२० रोजी मुख्यालयी राहात नसल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३(१) (दोन) चा भंग केला आहे म्हणून आपणाविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये या बाबत ७ दिवसाच्या आत खुलासा मागवला होता.त्यामुळे सूडबुद्धीने सर्व कागदपत्रे असताना केवळ मनस्ताप व दबाव आणण्यासाठी खोटी तक्रार नेकनूर पोलीस ठाण्यात केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.


डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांची तक्रार–

दि, ३०/०९/२०२० रोजी डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हाधिकारी बीड यांनी गावातील ३२७ लोकांची संभाव्य कोरोना संशयितांची यादी तयार केली होती. त्यामध्ये बोगस लोकांची नावे दाखल करण्यात आली असून या गैरकारभारास डॉ. राधाकिसन पवार मुख्य सुत्रधार असल्याची लेखी तक्रार पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ,आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली होती या गोष्टीचा राग मनात धरून कारवाई केली गेली असल्याचे डॉ ढवळे यांनी म्हटले आहे.


१२ घंटे कोरोना रूग्ण ताटकळत असल्याची तक्रार जिव्हारी लागली

———————————————-
आरोग्य विभागाचा ग्रामिण भागातील ढिसाळ कारभार, त्यातच दि ०५/०९/२०२० रोजी लिंबागणेश येथील ५ कोरोना बाधित रुग्णांना नेण्यासाठी रूग्णवाहिका न आल्यामुळे रात्रभर १२ घंटे रुग्णांची हेळसांड केल्याप्रकरणी विविध दैनिकात, ईलेक्ट्रॉनिक मिडीयावर पोलखोल केल्यामुळे मनामध्ये राग होता, तो सूडबुद्धीने खोटी कारवाई करुन काढण्यात आला याविषयी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत लेखी तक्रार डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे.


ईस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले २.५ लाख रुपयांचे सोने-चांदी प्रामाणिकपणे केले परत

वरठाणच्या तरुणाची पाचोऱ्यातील प्रामाणिकपणा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― ईस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी सापडले परंतु आपल्याला कोणाचे सोने नको,घामाने कमवु तेच आपले यानुसार वरठाण ता.सोयगाव येथील पाचोऱ्यात इस्तरीचे दुकान असलेल्या तरुणाने ज्या ग्राहकांचे सोने होते त्यालाच वापस केले आजही जगामध्ये असे प्रामाणिक लोक आहेत त्यांचे हे जिवंत उदाहरण आहे त्याचा हा प्रामणिकपणा पाहुन त्यांचे सर्वत्रकडुन कौतुक केले जात आहे.

ही घटना पाचोरा,ठाकरेनगर येथे घडली असुन तो प्रामाणिक तरुण गणेश जाधव हा वरठाण (ता सोयगाव) येथील रहिवासी आहे.

सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील गणेश ओंकार जाधव (वय ४६) ह्या तरुणांचा ईस्तरी करण्याचा व्यवसाय असुन गेल्या विस वर्षांपासून हा व्यवसाय वरठाण येथे करीत होता परंतु खेड्या गावात पाहिजे तेवढा धंदा होत नसल्याने गणेशने गेल्या चार वर्षांपासून पाचोरा( जि.जळगाव) शहरात भाड्याने गाळा घेऊन ईस्तरीचा व्यवसाय सुरू केला तेथील स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दीवसाकाठी तीनशे कींवा चारशे रुपये मिळत होते त्यामधुन वरठाण ते पाचोरा अपडाऊन पन्नास रूपये खर्च होत असे अनेकवेळा कपड्यांमध्ये शंभर, दोनशे ,पाचशे रुपये सापडले असून त्याने ज्यांचे पैसे होते त्यांचे त्याने प्रामाणिकपणे वापस केल्याने तसेच गणेश एक डोळ्याने आधंळा असुन तेथील स्थानिक नागरिकांचा मदतीचा हात पुढे करीत गणेशला एक पत्र्याची टपरी बनवुन दीली त्याठिकाणी ईस्तरीचा व्यवसाय सुरळीत चालू आहे..

गेल्या चार दीवसापुर्वी एक ग्राहक गणेशकडे कपडे ईस्तरीकरीता टाकुन गेले होते दुसऱ्या दिवशी कपडे ईस्तरीकरण्यासाठी पिशवीतुन काढले असता एक पाकीट खाली पडले पाकीट खोलुन बघीतले असता त्यामध्ये सहा सोन्याच्या अंगठ्या,एक सोन्याची पोत, चांदीचे कडे,कमरेची चैन असा जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी होते गणेशच्या टपरीमध्ये अनेक ग्राहकाच्या कपड्याच्या पिशव्या ईस्तरीसाठी आलेल्या होत्या आता हे सोने कोणाचे हा प्रश्र्न त्याला पडला चार दीवसानतंर साहेबराव पाटील (तलाठी) रा.बिड हल्ली मु .ठाकरेनगर पाचोरा हे गणेशकडे येवुन विचारणा केली असता की आमची काही वस्तु कपड्याच्या पिशवीत आली का आमचे सोने घरात कुठेच सापडत नाही तेव्हा गणेशने सांगितले की ते सोने मला सापडले आहे.

वरठाण ला घरी ठेवलेले सोने चांदी सोमवारी साहेबराव पाटील यांच्या स्वाधीन केले. यावेळी धनराज पाटील, गणेश पाटील,भागवत पाटील,बढे सर,नाना पाटील,अणिल चित्ते व कॉलनीतील नागरीक उपस्थित होते

◆ सोशल मिडिया वर देखील कौतुक

गणेश जाधव कडे एक एकर जमिन असुन ती जमिन नदीकाठावर असल्याने गेल्या पंधरवड्यात वरठाण परीसरात मुसळधार पावसामुळे नद्याना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने गणेशाच्या शेतातील कापुस पिक वाहुन मोठे नुकसान झाले आहे सद्या तो भाड्याच्या घरात राहत असुन देखील त्याला सापडलेले दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोने चांदी प्रामाणिकपणे वापस केल्याने सोशल मिडिया वर देखील गणेशचे कौतुक केले जात आहे.

■ प्रामाणिकपानाचा सोयगाव तालुक्याचा शिक्कामोर्तब

वरठाण ता.सोयगाव येथील पाचोरयाला इस्तरीचा व्यवसाय करत असतांना तब्बल अडीच लाखाचे सोन्याचे दागिने संबंधिताला परत केल्यावरून सोयगाव तालुक्याचा प्रामाणिकपणा जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब झाला आहे.

राज्यातील पञकारांना 50 लाखांचे विमा कवच द्या – अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्यातील पञकारांना 50 लाखांचे वीमा संरक्षणाचे कवच द्यावे यासह इतर मागण्या अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गुरूवार,दिनांक 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री यांना अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मार्च-२०२० पासून संपुर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असून त्यात अनेकांचे मृत्यु होत आहेत.महाराष्ट्र शासनाने अनेक विभागाच्या कर्मचारी यांना रूपये ५०.०० लक्ष विमा कवच दिले आहे.परंतू भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा या कामात मोलाचा वाटा असताना घोषणा करून ही विमा कवच दिले नाही.म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५०.०० लक्ष रूपयांची मदत करण्यात यावी.पत्रकार विमा योजना तातडीने सुरू करावी.,कोरोनामुळे आजारी असलेल्या पत्रकारांना रूग्णालयात बेड व ऑक्सीजन , व्हेंटीलेटरची तात्काळ व्यवस्था करावी.पञकार संतोष पवार,पांडूरंग रायकर यासह अनेक पत्रकारांच्या मृत्युस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.तरी निवेदनात नमूद मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक दृष्टीकोणातून विचार करून आठ दिवसांच्या आत मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा याप्रश्नी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय,अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर नाविलाजाने आमरण उपोषण करण्यात येईल.उपोषण काळातील संभाव्य परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिला आहे.सदरील निवेदनाच्या प्रती नोंदणीकृत डाकपत्राने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक, बीड यांना पाठवण्यात आल्या आहेत.


नुरभाई फाऊंडेशन तर्फे गोरगरिबांना किराणा किट तर कोरोना योद्धयांना सन्मानपत्र

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा येथील नुरभाई फाऊंडेशन यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त गोरगरिबांना किराणा किट तर कोरोना महामारित स्वताचे जिव धोक्यात घालून लोकांना मदत करणारे आरोग्य विभाग,पोलीस, समाजसेवक पत्रकार,व स्वच्छता कामगार यांना कोवीड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी जिल्हा संघटक अॅड,सय्यद वहाब,ता.अध्यक्ष शिवभुषन जाधव,राष्ट्रीय काँग्रेसचे ता.गणेश कवडे शिवसेना ता.अध्यक्ष राहुल चौरे,अॅड,जब्बार पठाण, न.प.सभापती श्रीहारी गिते, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना अन्सार,सय्यद आदमसेठ,प्रसिद्ध व्यापारी शफावोद्दीन सय्यद, सय्यद सज्जाद यांची होती.
माजी ग्रामपंचायत सदस्य,तथा सामाजिक बाधीलकी असणारे शहरातील थोर सामाजिक कार्यकर्ते मरहुम शेख नुरभाई हे सतत गोरगरिबानसाठी झटत होते त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव शेख इम्रान, व शेठ इरफान हे वडीलांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सायकल व गुणवत्त विद्यार्थ्यांनचा गुणगौरव, गोरगरीबांना मदत करत आसतात.दर वर्षीप्रमाणे आठव्या पुण्यतिथी निमित्त कोरोना महामारित गरीबांना किराणा व कोरोना महामारित स्वताचे जीव धोक्यात घालून लोकासाठी झटणारे आरोग्य विभागातील डॉ.सुर्यकांत सावंत, डॉ. शेख इम्रान, डॉ.मुंडे,पोलीस विभागातील बळीराम कातखडे,सामाजिक कार्यकर्ते मुन्ना अन्सार,पत्रकार दयानंद सोनवणे, महेश बेदरे,दत्ता देशमाने,शेख जव्वाद,सुंदरदास माने यांना कोवीड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शेख हमीद, शेख जब्बार,शेख सफदर मामु, शेख समीर शेख शहानवाज,रियाज सिद्दीकी,इलियास शिद्दीकी,मोहीद शेख,नदीम शेख यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.

अभिजीत राणे युथ फौडेंशन आयोजित वृत्तपत्र लेखन स्पर्धेत विश्वनाथ पंडित प्रथम

आठवडा विशेष टीम―

अभिजीत राणे युथ फौडेंशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जेष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ केशव पंडित यांच्या “ रक्त दानासाठी मानसिकता वाढवायला हवी, व्यवहार नको ” या पत्रास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांना वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण २०२० या पुरस्काराने लवकरच गौरविण्यात येणार असल्याचे युथ फौडेंशनचे संस्थापक, अध्यक्ष अभिजीत राणे यांनी जाहिर केले.

विश्वनाथ पंडित हे चाळीस वर्षाहून अधिकतम काळ अविरतपणे विविध विषयावर पत्रलेखनाद्वारे सामाजिक, नागरिक व्यथा, वेदना, समस्या मांडीत असतात. अनेक सामाजिक संस्थाच्या द्वारे त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग राहिलेला आहे.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक विश्वनाथ पंडित, द्वितीय दत्ता खंदारे, तृतीय प्रिया मेश्राम विजयी ठरले असून ४ सिराज शेख, ५ सुधीर कनगुटकर, ६ दत्तप्रसाद शिरोडकर, ७ सुभाष अभंग, ८यशवंत चव्हाण, ९ गणेश लेंगरे, १०किरण धुमाळ, तर उत्तेजनार्थ जनार्दंन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे, अनुज केसरकर आदि राज्यातील विविध जिल्हयातील, तालुक्यातील पत्रलेखक विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे महेश्वर तेटाबे, निसार अली, शांताराम गुडेकर, सुरेश पोटे, कैलाश रांगणेकर, आकाश पोकळे, पंकजकुमार पाटील, लक्ष्मण राजे, रफिक घाची, गणेश हिरवे, उदय सांगळे, नीलेश धुरी, श्याम ठाणेदार, वैभव पाटील, गुरूंनाथ तिरपनकर, शशिकांत सावंत यांना पत्रकारितेच्या योगदानाबद्यल विशेश पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी कळविले आहे.