औरंगाबाद दि.१२:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद शहरात 26 कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 653 झाली आहे. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 15 पुरूष आणि 11 महिला रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या औरंगाबाद शहरातील समता नगर (01), किल्लेअर्क (02) आणि असेफिया कॉलनी (01) येथील एकूण चार जण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याने आतापर्यंत 117 जण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) प्रशासनाने सांगितले आहे.
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर (02), एन-सात (04), एन-आठ (01), राम नगर (01), संजय नगर (05), प्रकाश नगर (01), चिकलठाणा (01), भडकल गेट (01), दत्त नगर (01), शहानूरमियाँ दर्गा (01), गांधी नगर (01), रोशन गेट (01), बायजीपुरा (01), भीमनगर, भावसिंगपुरा (01), इतर (04) या परिसरातील आहेत. तर मिनी घाटीत आज 21 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीत तपासणीसाठी पाठविले आहेत. सध्या मिनी घाटीत 95 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, असेही मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे.
घाटीत 53 कोविडबाधितांवर उपचार सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 53 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 49 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच 43 कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तर घाटीमध्ये एकूण 72 रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली. त्यापैकी 27 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला असून दोन रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. 11 रुग्णांचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. 14 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. घाटीत एकूण 110 रुग्ण भरती आहेत.
मकसूद कॉलनी, रोशन गेट येथील 37 वर्षीय स्त्री यांना खासगी रुग्णालयातून घाटी येथे काल (दि.11 मे रोजी) संध्याकाळी संदर्भीत करण्यात आलेले आहे. तसेच शहानूर मिया दर्गा येथील 57 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रोशन गेट येथील 42 वर्षीय पुरुष, तसेच जुना मोंढा, भवानी नगर येथील 27 वर्षीय गरोदर महिला, बायजीपुरा येथील 40 वर्षीय महिला, भीमनगर, भावसिंगपुरा येथील 74 वर्षीय महिला यांचा कोविड अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.