सोयगाव दि.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― काल दि.२२ रोजी १२ वा मौजे गलवाडा (अ) येथील शामराव जाधव व दत्तु जाधव यांच्या राहते घराला अचानक आग लागु घरातील संसार उपयोगी साहित्य आगीत जळुन खाक होवून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटणास्थळी पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांनी स्टाप सह भेट देवुन नुकसान झालेल्या कुंटुबाला मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
आज दि.२३.रोजी मा.पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण यांचे संकल्पणेतून मौजे गलवाडा (अ) येथील शामराव जाधव व दत्तु जाधव आगीत नुकसान झालेल्या या दोन्ही कुंटुबाला पोलीस ठाणे सोयगाव कडुन संसार उपयोगी साहित्य व अन्न धान्य देण्यात येवून सामाजिक बांधिलकीची जपण्यात आली आहे.यावेळी आगीत नूकसाण झालेल्या कुंटुंबीयांच्या चेह-यावर वेगळेच समाधान पाहावयास मिळाले. यावेळी पोलीस ठाणे सोयगाव येथील पो.नि.माधव गुंडीले, सपोनि.शकील शेख,पो काँ विकास लोखंडे, सागर गायकवाड, विनोद कोळी, यांचे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.मंडवे व नागरिकांनाच्या वतीने सर्व पोलीस ठाण्याचे आभार मानले.
0