बुलढाणा जिल्हामोताळा तालुका

गोठ्याला आग; नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

धामणगाव बढे (प्रतिनिधी) : येथील वार्ड क्र.२ मधिल लोकवस्तीत असलेल्यासोपान झिपरू बढे,प्रदिप अरविंद रेंगे,विकास वसंत बढे या तिन जनांच्या वेगवेगळ्या गोठ्याला बुधवार दुपारी २वाजे.दरम्यान अचानक पणे आग लागल्याची घटना घडलीअसुन ह्या मध्ये गुरांसाठी ठेवलेला भुस- कुटार,जवळपास २५ ते ३० ट्राली,टिनपत्रे शेती उपयोगी असलेली लाकडी अवजारे,आगीने जळल्यामुळे मोठे नुकसान झाले.आगीचे कारण कळु शकले नाही. सदर गोठा हा भरगच्च असलेल्या लोकवस्ती मध्ये असल्याने नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.
गोठ्यात वाळलेली लाकडे, जवळपास २५ ते ३० ट्राली जनावरांसाठी साठवून ठेवलेले भुस-कुटार असल्याने अचानक लागलेल्या आगीने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.त्यामुळे ह्या आगीची झळ आजुबाजूच्या शेतकऱ्यांच्या घरालाही बसली.आगीचे रूप पाहाता सर्वत्र भितीचे वातावरण तयार होऊन ग्रामस्थांनी धावाधाव करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.आग लागल्याच्या घटनेची बातमी गावात वा-यासारखी पसरताच सरपंच अँड युवराज घोंगडे, रियाज पटेल उपसरपंच, यांनी तात्काळ त्या परिरातील पाणी पुरवठा सुरु करून आग विझविण्यासाठी ग्रामस्थांन सोबत घटनास्थळी धाव घेतली ह्यावेळी क्रिष्णा भोरे,आरीफ खान,प्रदिप रेंगे, प्रदिप बोरसे,राहूल दहिभाते,बबलू लेणेकर,मयूर चव्हाण,सह नागरकानी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
धामणगाव बढे पोलिस कर्मचारी विलास चांडोळ,दळवी, चंदन्से यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आगीने नुकसान झाल्याने गुरांच्या चा-यांचा प्रश्न बिकट झाल्याने नुकसान ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत असुन दुष्काळी परिस्थितीत पुन्हा संकट उभे राहिल्याने शासनाने ह्या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button