Offer

कोरोना नियंत्रणासाठी सर्वांची राज्य शासनाच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी वाढली ; किशोर पाटील कुंझरकर यांचे मत

शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे मत

आठवडा विशेष टीम―

कोरोना ―हा संसर्गजन्य आजार आहे…चीन सारख्या महाकाय आणि महासत्ता असलेल्या देशाला देखील त्याच्याशी दोन हात करायला वेळ लागला.अजूनही देशात राज्यात परिस्थिती फारशी चांगली नाही..त्यामुळे सर्वांची आरोग्यविषयक काळजी घेण्याची जबाबदारी वाढलेली आहे.हा आजार भारतात महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात आलाय. भारत सरकारप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून युद्ध पातळीवर निर्णय घेतले आहेत.जेणेकरून पुढे चालून कोणतीही मोठी हानी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जातेय.मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार आरोग्य मंत्री नामदार राजेश भैय्या टोपे साहेब सर्व मंत्रिमंडळ शालेय शिक्षण विभाग तसेच राज्यातील सर्व सेवाभावी संस्था समाजसेवक स्वयंसेवी संस्था जबाबदार नागरिक तसेच पत्रकार बांधव शिक्षक आरोग्य विभाग सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी देखील अहोरात्र मेहनत घेऊन प्रशासनला तसेच सर्व जनतेला योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मदत व पुढाकार घेत आहेत व प्रशासन देखील डोळ्यात तेल घालून कार्य करीत आहे.यामध्ये कौतुकास्पद कार्य आहे ते आरोग्य विभागाचे आणि त्यांच्या डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचे तेही देशाच्या सैनिकांप्रमाणेच सेवा करताहेत.खबरदारीचा उपाय म्हणून जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वच्छतेचे सर्व नियम पाळावेत स्वतः गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत सर्वांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची ही वेळ असल्याने शिक्षकांनी देखील आपले कर्तव्य समजून दिलेली जबाबदारी पार पाडावीअसे स्पष्ट आवाहन शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी केले .

अजून काही दिवस सर्वांनी विशेष काळजी घेतल्यास आपल राज्य आणि राज्य सरकार सर्व जिल्हा प्रशासन या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण करण्यात सर्वांच्या सहकार्याने निश्चित यश मिळवेल असा ठाम विश्वास असल्याचेअसे शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव राज्य प्रवक्ते श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.

Back to top button