Offer

आ.सुरेश धसांचे तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर शेतकर्‍यांच्या पिककर्जासाठी संबुळ आंदोलन

आष्टी दि.१३:आठवडा विशेष टीम― शेतकर्‍यांना पिक कर्ज मिळालच पाहिजे, अशा घोषणा देत भाजपा नेते तथा आमदार सुरेश धस यांनी आज सकाळी बैलगाडीतून एसबीआय बँकेत जात घोषणाबाजी करत संबुळवादन आंदोलन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांची थट्टा करत असल्याचा आरोप करत बँक अधिकारी शेतकर्‍यांची हेळसांड करत असल्याच्या निषेधार्थ सुरेश धसांचे हे संबुळ आंदोलन आज पार पडले.याबबत अधिक असे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी आ. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना शेतकर्‍यांना कर्ज देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे ज्या बँकांनी पीक कर्जाचे अर्ज स्वीकारलेले आहे.परंतु शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही, अशा सर्व बँकांसमोर संबुळ आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज आ. सुरेश धसांनी आष्टी येथील एसबीआयच्या बँकेसमोर जाऊन आंदोलन केले. बैलगाडीतून संबुळ वाजवत सुरेश धसांचा काफिला बँकेवर जावून धडकला. दुधाला 10 रुपयांप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे, अतिव्रष्टीत फळबागा वाल्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या, राजगृहावर तोडफोड करणार्‍या माथेफिरूवर कडक कारवाई करा,अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मंजूर झालेले कर्ज प्रकरण तात्काळ वाटप करा.यासह आदी मागण्यांसाठी सुरेश धसांनी बँकेसमोर संबुळ आंदोलन केले.शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेच पाहिजे या घोषणांनी धसांनी परिसर दणाणून सोडलं. आष्टी,कडा कृषी कार्यालय, जळगाव,दौलावडगाव, धामनगाव, पिंपळा आदी ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांसमोर संबुळ आंदोलन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button