Offer

अभिनव पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

दिंद्रुड(प्रतिनिधी): येथून 1 किलोमीटर अंतरावर तेलगाव हायवेवर असलेल्या अभिनव पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.राजमाता जिजाऊ माँ साहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सक्सेस प्रायमरी स्कूल निखिल वाघमारे होते तर उद्घाटक म्हणून समाजसेवक सदाशिव आप्पा शेटे उपस्थित होते .प्रमुख पाहुणे म्हणून संपादक बंडू खांडेकर ,पत्रकार प्रकाश काशिद ,अमोल ठोंबरे, विद्या मंदिर इंग्लिश स्कूल प्राचार्य बळीराम पारेकर विलास खाडे, केंद्रप्रमुख सुरवसे ,विलास खाडे, सुरेश तिडके, प्रदीप ठोंबरे,साहेबराव बडे, लोकशक्ती माध्य.विद्यालयाचे विकास निकाळजे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सटाले मॅडम यांनी केले तर गणेश गटकळ सरांनी प्रस्तावित करून कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली.
मुख्याध्यापक अभिमान पारेकर, गणेश लाटे सर, शेख रमीज, सुनील शेंडगे आदींनी मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पत्रकार प्रकाश काशिद यांनी चिमुकल्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,त्यांना स्टेज करेज यावं, या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्नेह संमेलनप्रसंगी बालकलाकार चिमुकल्यांचे कौतुक करून गेल्या महिन्याभरापासून सराव घेत असलेल्या शिक्षक वृंदाना व या बालकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,
असे मार्गदर्शन पर भाषण करताना म्हटले.
विकास निकाळजे नंतर वाघमारे यांच्या अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन सत्राचा समारोप झाला.
वर्षा मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
सदर संमेलनात बालक बालिका ने देशभक्तीपर गीते, सिनेमा गीते, विविध गाण्यावर डान्स ,बोध दृश्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले
विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषा,सादरीकरण व शिक्षकांचे परिश्रम याला उपस्थित माता- पालक वर्ग यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनव पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका मीना पारेकर, लाटे राखी आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button