Offer

परळी येथील समारोपाच्या सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा – धनंजय मुंडे

परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे!

बीड दि.०९(प्रतिनिधी): बीड येथील राष्ट्रवादी भवनमध्ये परळी येथे होणाऱ्या परिवर्तन यात्रेच्या समारोपाचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या, बीड जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

परिवर्तन यात्रेदरम्यान आतापर्यंत लोकांची अलोट उपस्थिती पाहता, परिवर्तनाची चाहूल लागली आहे हे निश्चित. अखंड महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन रायगड येथून यात्रेची सुरुवात झाली.

येणाऱ्या २३ तारखेला प्रभु वैद्यनाथांच्या चरणी, परळी येथे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील, मा. छगनजी भुजबळ साहेब, मा. अजितदादा पवार साहेब, मा.दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, युवक, युवती, व्यापारी, असंघटीत क्षेत्रातील कामगार व शेतकरी बांधव परिवर्तनासाठी उपस्थित राहणार आहेत.आपण सर्वांनी या परिवर्तन यात्रेच्या परळी येथील सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button