सोयगाव,दि.२८:आठवडा विशेष टीम―
कोविड-१९ च्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्वच मद्यदुकाने बंद असतांना मात्र सोयगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या काळातही अवैध देशी दारू सुसाट झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात गावागावात देशी दारू लॉकडाऊन मध्येही सहज उपलब्ध होत आहे.
सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊनमध्येही दारूचा अवैध साठा उपलब्ध होत आहे.एकीकडे महसूल विभागाने तालुक्याच्या ठिकठिकाणी जिल्हाबंदीचे तपासणी नाके उभारले आहे,परंतु या नाक्यांना गुंगारा देवून जळगाव जिल्ह्यातील अवैध दारूचा साठा सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात उपलब्ध होत आहे.हा साठा कसा सोयगाव तालुक्यात उतरविण्यात येत्यो याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात गर्दी उसळली-
सोयगाव तालुक्याच्या गावागावात देशी दारू सुसाट झाल्याने सायंकाळ नंतर मात्र देशी दारूच्या विक्री केंद्रांवर मोठी गर्दी उसळत असल्याने सोशल डीस्टेन्सहा फज्जा उडाला आहे.त्यामुळे होमकोरोटाईन असलेले नागरिकही दारूच्या दुकानांवर मुक्तसंचार करत असल्याने गोंधळ उडाला आहे.