जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मराठा प्रतिष्ठानच्या वतीने शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीत मंगळवारी पोलिसांनीही सहभाग नोंदवून सोयगावसह जरंडी,भैरवनाथ महाराज शिवार आदी ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली यामध्ये मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. सामाजिक कार्याचा जिल्हाभर ठसा उमटवत ओळख प्रस्थापित करणाऱ्या मराठा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी वृक्स्ध लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती.या मोहिमेत सीताफळ,करंज,आवळा,गुलमोहर,चिंच,बेहडा आदी वृक्षांच्या लागवडीची मोहीम फत्ते झाली.जिल्हाध्यक्ष विजय काळे,पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,पत्रकार संघटनेचे भरत पगारे,सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील आदींचं हस्ते वृक्ष लागवड करण्यात येवून या लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व जतन करण्याची जबाबदारी मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.तालुकाध्यक्ष विजय चौधरी,उपाध्यक्ष समाधान जाधव,तालुका सचिव सचिन महाजन, खजिनदार आप्पा वाघ सल्लागार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर युवरे ,प्रमोद वाघ ,सागर शिंदे (मुंबई ) अमोल बोरसे ,समाधान घुले,बबलू बावस्कर, गुणवंत ढमाले,सरपंच प्रकाश गव्हांडे ,(प्रसार प्रमुख) नानासाहेब जुनघरे ,सुनिल ढमाले ,गणेश गवळी ,पिंटू गव्हांडे पिटू गवळी किशोर(गोटू) बावस्कर, आबा ऊगले ,समाधान शिदें ,सोनू सागरे. आदींनी प्रत्येकी पन्नास वृक्षांची जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यामुळे सोयगाव आणि जरंडी परिसर हिरवाईने नटणार आहे.दरम्यान मराठा प्रतिष्ठानचं या उपक्रमात पोलीसही दिमतीला मिळाल्याने पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनीही वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून पोलिसांचा सामाजिक सहभाग दाखवून दिला आहे.त्यामुळे पोलीसही रस्त्या रस्त्यावर वृक्ष लागवड करतांना दिसून आले,शहरातील भैरवनाथ मंदिर परिसरात लागवड मोहिमेत जिल्हाध्यक्ष विजय काळे,भरत पगारे,विजय पगारे,योगेश बोखारे,पूनम परदेशी,सुनील काळे,सुलेमान शेख,महेश चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,आदी तर जरंडी येथील कार्यक्रमात सरपंच समाधान तायडे,तालुकाध्यक्ष विजय चौधरी,उपाध्यक्ष समाधान जाधव,ग्रामपंचायतीचे संतोषकुमार पाटील,सल्लागार ज्ञानेश्वर युवरे,खजिनदार आप्पा वाघ,तालुका सचिव सचिन महाजन,प्रशांत पाटील,आदींची उपशिती होती.
सोयगाव पोलीसही सामाजिक कार्यात झोकावले असून पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी भैरवनाथ महाराज मंदिर परिसरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना जतन व संवर्धन करण्यासाठी दत्तक घेतल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.