जिजाऊ जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.
आठवडा विशेष | प्रतिनिधी
पाटोदा: पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गरीब , गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेकांना चांगली मदत मिळत आहे ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन पाटोदा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष दिपकराव तांबे ( तात्या ) यांनी व्यक्त केले.
आज तांबाराजुरी हायस्कूलमध्ये पाटोदा तालुका संभाजी ब्रिगेड आणि माणूसकीची भिंत च्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जयंती निमित्त शाळेतील पन्नास पेक्षा जास्त गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग , कंपास पेटी , रजिस्टर वह्यां अशा आवश्यक शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिपकराव तांबे (तात्या )तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड चे पाटोदा तालुका अध्यक्ष रामदास भाकरे, उपाध्यक्ष अक्षय भैय्या आरसुळ, माणूसकीची भिंत चे प्रमुख दत्ता देशमाने शेठ,अक्षय नाईकवाडे, मुसळे सर, डॉ. रविंद्र गोरे, डॉ.नांदे साहेब , मोहळकर फौजी , मुख्याध्यापक सानप सर,गोकूळ डिसले, लक्ष्मण तांबे , राष्ट्रीय खेळाडू विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांची भाषणे झाली.
शाळेच्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थी खूष झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंगुळे सर यांना केले.
