अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―गेल्या 10 ते 12 वर्षांपासुन विनाअनुदानीत तत्वावर काम करणार्या अनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार,दि.26 ऑगस्ट रोजी शाळा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.या बंदला पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने पाठींबा जाहीर केला होता.दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई तालुक्यात सर्व शाळांनी बंद पाळुन विनाअनुदानीत शिक्षकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी पाठींबा दर्शविला या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विनाअनुदानीत शिक्षकांच्या वतीने यावेळी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
विनाअनुदानीत शिक्षकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे प्रचलीत नियमानुसार पात्र शाळांना अनुदान द्यावे,सर्व कर्मचार्यांना सेवा संरक्षण द्यावे आणि बीड येथे दाखल करण्यात आलेले अनुदान प्रस्ताव लवकरात लवकर विभाग स्तरावर पाठवावे अशा असून अंबाजोगाई येथील गटशिक्षणाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शाळा शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष ए.पी. क्षीरसागर,तालुका उपाध्यक्ष राम घोडके,तालुका कार्यध्यक्ष झेड.एम. चांमले,मोरे,विनोद उंबरे,बलुतकर, सोमवंशी,रोमन, राऊतवाड,सोन्नर, मुळी,कराड,धायगुडे, पाटील,पवार,फसले, रूपनर,चव्हाण, अकोलकर,लोमटे, भनगे,साठे,खुरेशी, पवार आदींसहीत शिक्षकांच्या स्वाक्षर्या आहेत. या शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
