Offer

लोकसभा निवडणूक 2019 :राष्ट्रवादीची 12 उमेदवारांची पहिली यादी तयार, यांना मिळणार तिकीट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही नगरमधील उमेदवाराच नावं जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज १२ जागांवरील उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. तर त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, परभणीतून राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कल्याण येथून बाबाजी पाटील, ठाणेतून आनंद परांजपे, जळगावमधून गुलाबराव देवकर, बुलडाणा येथून राजेंद्र शिंगणे आणि लक्षद्वीप साठी मोहम्मद फैजल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विषेश म्हणजे, हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. उरलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर फेरफार होणार आहे. त्याबाबत बोलणं सुरू असून एक-दोन दिवसात तो प्रश्नही निकाली लागेल,असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हे आहेत राष्ट्रवादीचे 12 उमेदवार

  1. बारामती: सुप्रिया सुळे
  • सातारा: उदयनराजे भोसले
  • कोल्हापूर: धनंजय महाडिक
  • रायगड: सुनील तटकरे
  • परभणी: राजेश विटेकर
  • मुंबई उत्तर पूर्व: संजय दिना पाटील
  • कल्याण: बाबाजी पाटील
  • ठाणे: आनंद परांजपे
  • जळगाव: गुलाबराव देवकर
  • बुलडाणा: राजेंद्र शिंगणे
  • लक्षद्वीप: मोहम्मद फैजल
  • हातकणंगले: स्वाभिमानी शेतकरी संघटना


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button