Offer

मजुरांना दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा―भाई विष्णुपंत घोलप

पाटोदा:शेख महेशर―दि. १७/०८ /२०१५ रोजी दुष्काळामध्ये होळपळणाऱ्या शेतकरी व कष्टकरी मजुरांनी ता.पाटोदा.जि.बीड येथील उपविभागीय कार्यालयावर आपल्या हक्कासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्च्या नंतर आंदोलन कर्त्यानाच पोलीसांनी मारहाण करुन त्यांच्या वर ३५३ व इतर कलमातंर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले होते. ते परत घेऊ म्हणून तात्कालीन रोहयो उपजिल्हाधिकारी बीड यांनी लेखी आश्वासन देऊन ही अद्याप पर्यंत त्या कष्टकरी मजुरावर पोलीसांचा व कोर्टाचा ससेमिरा चालुच राहिला त्या कष्टकरी मजुरावर होणारा अन्याय रोखण्यासाठी आपण दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावी असे लेखी निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी दिले आहे. पाटोदा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी व मजूरांवर कलम ३५३ व इतर कलमा अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल झाले होते.ते गुन्हे परत घेण्यात येतील व रोहयो मजुरांनी केलेल्या कामाचे पैसे दिले जातील असे लेखी आश्वासन तत्कालीन रोहयो उपजिल्हाधिकारी बीड यांनी पाटोदा तहसील कार्यालयात आंदोलकांसमोर दि.०९ / ०९ / २०१५ रोजी रात्री ८:३० वाजता दिले होते . त्या नंतर ३ वर्षानी पाटोदा कोर्टाने पोलीस मार्फत ५१ मजुरांवर नोटीस पाठविण्यास सुरुवात केली. २०१८ व २०१९ या वर्षात ही त्या मजुरांवर दाखल झालेले फौजदारी गुन्हे परत घेण्यात आलेले नाहीत. आणि २ आठवडे केलेल्या कामाचे पैसे ही मजुरांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत,आणि ज्या कालावधीत मजुरांना काम उपलब्ध करून दिले नाही त्या कालावधीचा शासन नियमानुसार बेकारी भत्ता उपजिल्हाधिकारी ( रोहया ) बीड यांनी देण्याबाबत मा . जिल्हाधिकारी यांचे स्तरावर आवश्यक माहिती सादर केली जाईल या विषयी जिल्हाधिकारी बीड या बाबत अंतिम निर्णय घेतील तो आपणास तातडीने कळवून आंमलात आणला जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यांची अंमलबजावणी अद्याप ही झालेली नाही, हा मजुरांवर केलेला अन्याय आहे. आता तर ३५३ व इतर कलमा अंतर्गत मजुरांना जिल्हास्तरावरील न्यायालयात चकरा माराव्या लागतील त्या साठी आपण दिलेल्या लेखी आश्वसनाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि त्या कष्टकरी मजुरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी रोहयो उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button