Offer

ग्रामविकास विभाग करणार विविध २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगा भरती

ना. पंकजाताई मुंडे यांचा धाडसी निर्णय ; राज्यातील बेरोजगारांना मिळवून दिली शासकीय नोकरीची सुवर्णसंधी !

मुंबई दि. ०२ :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी धाडसी निर्णय घेत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय नोकरीचे दालन खुले करून दिले आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगा भरती होणार असून तशी जाहिरात उद्यापासून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे. या मेगा भरतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास विभागा अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांवर ही मेगा भरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत, तथापि ही पदे भरल्यास कर्मचा-यांवरील कामावरचा ताण कमी तर होईलच शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी मेगा भरती बाबत नुकताच धाडसी निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.

हया पदासाठी होणार मेगा भरती

ग्रामविकास विभागाच्या आस्था ८ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष ५० टक्के), आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशूधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.

औरंगाबाद विभागात २७१८ पदे

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक जागा हया पुणे विभागात २ हजार ७२१ असून तर त्या खालोखाल औरंगाबाद विभागात २ हजार ७१८ आहेत. नाशिक विभागात २ हजार ५७४, कोकण विभागात २ हजार ५१, नागपूरमध्ये १ हजार ७२६ तर अमरावती विभागात १ हजार ७२४ अशा एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार होणार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून उद्यापासून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.


One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button