Offer

बातमी इफेक्ट : उप्पलखेडा,वरठाण येथील गावाबाहेरील मोतीमाता मंदिराच्या पाठीमागील जुगार अड्डयावर सोयगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १ लाख १७ हजार १४० रूपयांचा मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त

बनाेटी,दि.१५(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): उप्पलखेडा, वरठाण (ता.सोयगांव) येथील गावाबाहेरील मोतीमाता मंदिराच्या पाठीमागील जुगार अड्डय़ावर शुक्रवारी (ता. १५ )सोयगाव पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख सतरा हजार एकशे चाळीस रूपयांचा मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले,या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होळी आणि निवडणूकीच्या तोंडावर सोयगांव पोलीसांनी अवैधरीत्या धंदा करणाऱ्यांविरुदध मोहीम उघडली असुन उप्पलखेडा येथील मोतीमाता मंदीराच्या पाठीमागे गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा चालू असल्याची माहिती खबऱ्यातर्फे पोलिसांना मिळाली त्यानुसार सोयगाव पोलीसांनी खबऱ्यातर्फे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी सापळा रचून मोतीमाता मंदीराच्या पाठीमागील जुगार अड्डय़ावर छापा टाकून चार दुचाकी, एकविसशे रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एक लाख सतरा हजार एकशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन जुगार खेळणारे गोरख मोरसिंग राठोड, बालु दावल पवार, अजमल सिताराम राठोड, शेषमल फत्तु चव्हाण यांच्यावर मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनालील पथकात वरीष्ठ पोलीस निरीक्षक मदन गुडींले, पोलीस निरीक्षक शेख शकिल, सहायक पोलीस निरीक्षक शरद रोडगे, ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, दिलीप तडवी, दिपक पाटील, सुभाष पवार, कौतीक सपकाळ यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button