पाटोदा:गणेश शेवाळे― राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण तरूणींना नवीन उद्योजक बनण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम घेण्यात आले असुन योजनेचे निकष
1) वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे
- स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
- इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त 20%
- खेळते भांडवल :- जास्तीत जास्त 30%
5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%
6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
7) *सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे तसेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे*
8) पात्र मालकी घटक :- वैयक्तिक , भागीदारी, बचत गट
9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र 1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड 3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट 4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक ) 5)हमीपत्र (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल 6)प्रकल्प अहवाल 7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर ) 8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग ) 9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र 10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर). 11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना हे आवश्यक आहे वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ http://maha-cmegp.gov.in
या संकेत स्थळाला भेट दयावी व आधीक माहिती साठी या वरील संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावेत आशे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे नेते दिपक दादा घुमरे यांनी केले आहे.