प्रशासकीयब्रेकिंग न्युज

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले.

मुंबई शहरामध्ये क्रॉस मैदान येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. यावेळी सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमार, गृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या  ड्रिलमध्ये पोलीस, एनडीआरएफ,  सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, गृह रक्षक दल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था,  स्थानिक जिल्हा प्रशासन, एनएसएस,  एनसीसी यांनी सहभाग घेतला. तसेच अणुशक्ती नगर येथे ब्लॅक आऊट मॉक ड्रिल झाले.

राज्यात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर,  पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत,  रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ,  रायगड,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मॉक ड्रिल घेण्यात आले.

या ड्रिलमध्ये सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच  हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला गेला. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button