सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव परिसरात झालेला रिमझिम पावूस आणि त्यामुळे वाढलेली शेती मशागतीच्या कामांनी मजुरांना मिळालेले काम यामुळे मंगळवारी रक्षाबंधनचं आठवडे बाजारात महिलांची मोठी गर्दी वाढली होती.
सोयगाव परिसरात माजुरांचाय हातांना मिळालेले काम यामुळे सोयगाव शहराचा आठवडे बाजार गर्दीने फुलला परंतु वाढत्या भाजीपाल्यांच्या महागाईचा फटका मात्र नागरीकांन बसला होता.सतत १९ दिवस झालेल्या रिमझिम पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे ऐन रक्षाबंधनचं मुहूर्तावर भाजीपाल्याची अवाक घटल्याने महागाई वाढली होती.मात्र गर्दीने आठवडे बाजार फुलून गेला होता.
रक्षाबंधनची लगीनघाई-
बहिण आणि भाऊ यांच्या अतूट नात्याचा सण म्हणून ग्रामीण भागात महत्व प्राप्त झालेला रक्षाबंधन सण दोन दिवसावर येवून ठेपला असल्याने आठवडे बाजारात महिलांनी मोठी गर्दी केली होती.