Offer

पाऊसाने कुडकुडत बसलेल्या निराधार वयोवृद्ध जोडप्याला पोलिसांचा आधार ,स्वखर्चाने केली निवाऱ्याची सोय

लिंबागणेश/बीड दि.७ जुलै:आठवडा विशेष टीम― मंगळवारी सायंकाळी ४ वा.सुमारास आलेल्या वादळीवाऱ्यासह पाऊसाने निराधार वयोवृद्ध जोडप्याचं घरटं उद्धवस्त झाले, नेकनुर आणि लिंबागणेश येथिल पोलिस प्रशासनाने स्वखर्चाने त्यांचे घरटे बांधुन देऊन दोघांनाही संपूर्ण पोशाखाचा आहेर करत गावकऱ्यांच्या मदतीने आधार दिला, पुन्हा एकदा खाकीवर्दीतील माणुसकीचा प्रत्यय लिंबागणेशकरांना आला.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश–

आज सायंकाळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तबाजी विठोबा थोरात व केशरबाई तबाजी थोरात या निराधार वयोवृद्ध दाम्पत्याच्या झोपडी वरील पत्रे उडून गेले. दोघांनीही निवा-यासाठी झोपडी समोरील पोलिस चौकीचा आधार घेतला. नेकनुर ठाणे येथिल पोलिस उपनिरीक्षक दिपक रोटे आणि सहकारी पो.हे.कां.महेश आदटराव काही तपासानिमित्त लिंबागणेश चौकी येथे आले होते. वयोवृद्ध जोडप्याची संपुर्ण भिजलेल्या कपड्यासह थंडीने कुडकुडत असलेली अवस्था पाहून दोघांसाठी नविन संपूर्ण पोशाख आणला. त्याचबरोबर लिंबागणेश येथिल पोलिस कर्मचारी जमादार पारधी एस.एम., सोनावणे एस.एम., राऊत एस.डी. , ढोबळे आर.आर. , राख जी.डी. यांनी स्वखर्चाने उद्ध्वस्त झालेली झोपडी तात्काळ बांधून देण्याचे ठरवत भर पावसात ग्रामस्थांच्या मदतीने पावसात भिजत झोपडीवरील पत्रे, मेणकापडासह ,अगदी व्यवस्थित बांधुन दिले,यावेळी परसुराम गायकवाड, अमोल थोरात, विलास काटे, रमेश थोरात, सुनिल थोरात, आरुण निर्मळ, हनुमान थोरात, विशाल थोरात,सुरज थोरात, कचरूदादा निर्मळ आदिंनी सहकार्य केले.
वयोवृद्ध थोरात दाम्पत्याच्या चेह-यावरील हावभाव आणि आनंदाने आलेले अश्रु पाहून कर्तव्यदक्षतेमुळे कठोरपणे लागणा-या पोलिसांचे डोळेही पाणावले होते, ग्रामस्थांना पुन्हा एकदा खाकीवर्दीतील माणुसकीची चर्चा ग्रामस्थांमध्ये दिसून येत होती.

लक्ष्मण केंद्रे ,स.पो.नि. नेकनुर ठाणे–

कर्तव्यदक्षतेमुळे जरी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पोलिस प्रशासन कठोरपणे वरिष्ठांच्या आदेशानुसार वागत असतिल, तरीसुद्धा हळुवार प्रसंगी त्यातला संवेदनशील माणुस जागा होतोच. आमच्या अधिकारी-कर्मचारी यांनी एका वा-यावादळात झोपडी उद्ध्वस्त झालेल्या निराधार वयोवृद्ध जोडप्याला निवारारुपी आधार दिला,मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button