Offer

बजाजनगरात शासकीय धान्यांचे घरोपोच वाटप

बजाजनगर:आठवडा विशेष टीम― सदया देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून बजाजनगर परीसरात लाँकङाऊन असतांना स्वस्त धान्ये दुकान नं 248 जोतीराम जाधव याच्या वतीने कोरोना बांधित काँटेनमेट झोन मधील रहिवाशा असलेल्यानां शासकीय धान्यांचे(१५) रोजी वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख बपपा दळवी, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे, सुरेखा लगङ,सामाजिक कार्यकर्ते कैलास भोकरे,अशोक लगङ,आदिक पाटील,युवानेते रोहित खैरे, वैभव जाधव,संजय काळे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या अनुषंगाने बजाजनगर परीसरात असलेल्या २६ कुंटूबधारकानां त्याच्या घरोघरी जाऊन शासकीय धान्यांचे वाटप करण्यात आले.या धान्ये वाटप उपक्रमाबाबत परीसरातील कोरोना कँटेनमेट झोन मधील शिधाधारकांनी धान्ये दुकानदारांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button