पुणे : गोरक्षक म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा चालविण्याच्या पद्धतीवरुन असलेल्या वादातून धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार सासवड मधील झेंडेवाडी येथे काल मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. सविस्तर वृत्त असे की,पंडित मोडक, विवेक मोडक हे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा चालवितात. ही गोशाळा व्यवस्थित चालवत नसल्याचे मिलिंंद एकबोटे यांचे म्हणणे आहे. त्यावरुन त्यांच्यात वाद होता.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
याप्रकरणी सासवड पोलिस यांनी वडकीतील विवेक मोडक,पंडित मोडक यांच्यासह त्यांच्या ४० ते ४५ जणांवर दंगल घडविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पंडित मोडक, विवेक मोडक हे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा चालवितात. ही गोशाळा व्यवस्थित चालवत नसल्याचे मिलिंंद एकबोटे यांचे म्हणणे आहे. त्यावरुन त्यांच्यात वाद होता. सासवडपासून ७ किलोमीटरवर असलेल्या झेंडेवाडीत मंगळवारी सायंकाळी सिताराम बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मिलिंद एकबोटे आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम रात्री सुरु झाला होता. त्यावेळी मारुती मंदिरात मिलिंद एकबोटे प्रसाद घेण्यासाठी बसले असताना मोडक यांचे ४० ते ४५ समर्थक आले. त्यांनी एकबोटे व त्यांच्याबरोबरच्या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. त्यात तिघेही जखमी झाले आहेत. सासवड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.