Offer

मतदारांच्या पाठबळावर विश्वास सार्थ करून दाखवू―डाॅ. प्रीतमताई मुंडे

बीडच्या उमेदवारीबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उध्दव ठाकरे, आठवले, ना. पंकजाताई मुंडेंचे मानले आभार

बीड दि.२१(प्रतिनिधी): सर्व सामान्य मतदारांच्या पाठबळावर विजयश्री खेचून आणून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू अशी प्रतिक्रिया बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच जिल्हाभरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत उमेदवारीचे जोरदार स्वागत केले.

भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत बीड लोकसभा मतदारसंघातून डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर जिल्हयात सर्वत्र कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. उमेदवारी जाहीर होताच डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी प्रतिक्रिया देतांना सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हयात झालेली विकास कामे आणि सर्व सामान्य मतदारांची असलेली भक्कम साथ यामुळे आपण या निवडणुकीत पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी होवू आणि पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे डाॅ. प्रीतमताई मुंडे यांनी बोलतांना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button