पिंपळनेर (धुळे):आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वच बंद असल्याकारणाने शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल त्याला कावडीमोल दराने विकावा लागत आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिनाम्हणून शेतात असलेले पीक जगवणे शेतकऱ्याला जिकिरीचे झाले आहे. वास्तविक, गेल्या वर्षी अतिवृष्टीसह भरपूर पाऊस पडूनही सद्यःस्थितीला पाण्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारण भूगर्भात मूळ बेसाल्ट खडकावर संपूर्ण गावाचे शिवार आहे. बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यावर मार्च व एप्रिल महिन्यापर्यंत परिस्थिती बरी होती. पण आज स्थिती बिकट आहे. म्हणून लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन प्रवाहीत करून ८ नंबर चारीद्वारे पाणी सोडावे, यासाठी मलांजन ग्रा. पं. पदाधिकारी, साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे, उभरे गावचे सरपंच, शरद सोनवणे आदींनी उपअभियंता, सिंचन विभाग, पिंपळनेर यांना निवेदन दिले आहे.
0