सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― राज्यातील पोलीस दल कोरोनाचं संसर्गाच्या विळख्यात अडकले असतांना ग्रामीण भागाची सक्षम भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तब्बल ४५ दिवसापासून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या सोयगाव पोलिसांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून अस्थिरता पसरली आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ५१ गावांना सलग ४५ दिवसापासून लॉकडाऊनच्या बंदोबस्ताकमी रस्त्यावर फिरणाऱ्या सोयगाव पोलिसांची सुरक्षाच धोक्यात आली आहे.या पोलिसांच्या संपर्कात कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या पाचोरा,जळगाव आदी भागातील नागरिक रात्रीच्या व दिवसाच्या गस्तीत संपर्कात येत असतात,त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाच्या फैलाव होवू नये यासाठी सोयगाव पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावत असतांना अचानक राज्याचे पोलीस दल कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकल्याचे वृत्त ऐकताच सोयगाव पोलीस दलात अस्थिरता पसरली आहे.त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान यासाठी सोयगाव पोलिसांनी नियमावली तयार केली असून नियमावलीत तक्रारदाराचे पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच निर्जंतुकीकरण करण्यात येवून तक्रारदाराने मास्क लावलें असल्यासच त्याला पोलीस ठाण्यात प्रवेश देण्यात येईल तसेच तक्रारदाराच्या सोबत विनाकारण कोणत्याही व्यक्तीने पोलीस ठाण्यात येऊ नये आणि अंतरावरूनच तक्रारदाराने संभाषण करावे अशी नियमावली तयार करण्यात आली आहे.
सोयगाव पोलिसांची तालुकाभर रात्रंदिवस गस्त कायम चालू असून लॉकडाऊनच्या नियमांची उल्लंघन होवू नये यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोलीस भटकंती करत आहे सोयगाव तालुका हा जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे.त्यातच पाचोरा हे जळगाव जिह्यातील क्रोरोना हॉट स्पॉट झाले आहे.त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांचा सोयगाव च्या ग्रामीण भागात मोठा संपर्क वाढला असल्याने कोरोना योद्द्धा म्हणून ठरलेल्या पोलिसांना या जिल्ह्याबाहेरील नागरिकांशी संपर्क येत आहे.